News Flash

इन्फोसिसमध्ये ३,००० नोकऱ्यांवर गंडांतर अटळ

बँकेसाठी अमेरिकेतील आयबीएमचेही तांत्रिक सहकार्य आहे.

नारायण मूर्ती आणि संचालक मंडळात मतभेद
  • ‘ब्रेग्झिट’ चा भारताला पहिला प्रत्यक्ष दणका..
  • युरोपातील ग्राहक ‘आरबीएस’ बँक गमावल्याने संकट

युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनमधील जनमताचा कौल अर्थात ब्रेग्झिटचे थेट हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या दृष्टीने चिंताजनक म्हणजे इन्फोसिस टेक्नॉलॉजीजची युरोपातील एक आघाडीची ग्राहक असलेली बँक-    रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडने (आरबीएस) हाती घेतलेल्या व्यवसाय पुनर्बाधणीमुळे इन्फोसिसबरोबरच्या सेवा करार गुंडाळणार आहे. यातून इन्फोसिसच्या ३,००० कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार आहे.

युरोपातील (एडिनबर्गस्थित) रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडने ब्रिटनमध्ये स्वतंत्र बँक स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या बँकेला विलियम्स अँड ग्लेन या सल्लागार कंपनीबरोबर इन्फोसिसचे माहिती तंत्रज्ञान पाठबळ आहे. यासाठी इन्फोसिसचे भारतातील ३,००० कर्मचारी कार्यरत आहेत. तर बँकेसाठी अमेरिकेतील आयबीएमचेही तांत्रिक सहकार्य आहे.

मात्र आता या बँकेचे ब्रिटनमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण होणार असल्याने ग्राहक बँकेच्या सेवा तसेच त्याच्याशी निगडित मनुष्यबळ रचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीने या कर्मचाऱ्यांना अन्य प्रकल्पात गुंतविण्याबाबत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आश्वस्त केले असले तरी ही संख्या कमी होऊ शकते, असे संकेतही दिले आहे.

रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडच्या रूपात इन्फोसिसचा मोठा ग्राहक जाणार असून या बँकेबरोबर करण्यात आलेला पाच वर्षांसाठीचा ३० कोटी पौंडांचा व्यवहारही संपुष्टात येणार आहे. यामुळे इन्फोसिसच्या भविष्यातील महसुलावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीने जुलैमध्ये तिमाहीत वित्तीय निष्कर्ष जाहीर करताना एकूण वार्षिक विक्री १०.५ ते १२ टक्के असेल, अशी शंका व्यक्त केली होती. वर्षभरापूर्वी हे प्रमाण ११.५ ते १३.५ टक्के होते.

इन्फोसिसच्या या घोषणेमुळे मंगळवारी कंपनीचा समभाग १.१६ टक्क्यांनी खाली येत १,०५०.९५ वर स्थिरावला. रोजगार कपातीबरोबरच कंपनीच्या महसुलावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत गुंतवणूकदारांनी समभागांच्या विक्रीचे धोरण अवलंबिले.

ब्रेग्झिटमुळे तेथे व्यवसाय असलेल्या भारतीय कंपन्या धास्तावल्या असून इन्फोसिसबाबत आलेल्या निर्णयामुळे या कंपन्यांमध्येही धडकी बसली आहे. व्यवसाय घटीसह कर्मचारी कपातीचे संकट या कंपन्यांवर येऊ घातले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 5:30 am

Web Title: infosys job issue
Next Stories
1 ‘आयएफएससी’साठी स्थापित कार्यदलाच्या अध्यक्षपदाचा पेच!
2 महागाई वाढू देणार नाही!
3 ‘राजन यांचा कित्ता उत्तराधिकाऱ्याने गिरवावा’.
Just Now!
X