04 August 2020

News Flash

श.. शेअर बाजाराचा : इथे शुद्ध लोणकढी (थाप) मिळेल!

भलत्या आमिषांना भुलून पसा अडकवून बसणारे भोळे गुंतवणूकदार आणि शेअर बाजार बदनाम करणाऱ्या अपप्रवृत्तींचा हा ओझरता वेध.. नुकताच घणसोलीहून अक्षय गांगणे यांचा फोन आला होता. फास

| March 2, 2013 01:23 am

भलत्या आमिषांना भुलून पसा अडकवून बसणारे भोळे गुंतवणूकदार आणि शेअर बाजार बदनाम करणाऱ्या अपप्रवृत्तींचा हा ओझरता वेध..
नुकताच घणसोलीहून अक्षय गांगणे यांचा फोन आला होता. फास ब्रोकिंग (नाव बदलले आहे) नावाच्या एका ब्रोकिंग फर्ममधील कुणा एका नुपूर (पुनश्च नावात बदल) नावाच्या व्यत्तीने अक्षयना दोन लाख रुपये आमच्याकडे ठेवा आणि दर महिना सुमारे दोन ते तीन टक्के परतावा मिळेल  असे तोंडी आश्वासन दिले. अक्षय यांचे नशीब जोरावर होते ते अशासाठी की दोन लाख रुपये त्या ब्रोकरकडे ठेवण्याच्या आधी त्यानी मला फोन केला आणि अशा प्रकारे पसे ठेऊ का? मला खरोखरच दोन ते तीन टक्के  परतावा दर महिन्याला मिळेल का अशी विचारणा केली. बहुसंख्य वेळी असे होते की अनेक मंडळी अशा प्रकारे पसे देतात आणि मग मला फोन करतात ! संत वचन आहे ना की ‘आधी केले मग सांगितले!’ मी एका वाक्यात अक्षयना सांगितले की मुळीच एक रुपयादेखील अशा प्रकारे देऊ नका. दोन दिवसानी पुन्हा नुपूर साहेबांचा फोन की पसे कधी घेऊन येता? त्यावर अक्षय यांनी अशा प्रकारे पसे तुमच्याकडे देणे मला मान्य नाही, असे सांगून फोन ठेवून दिला. परत परत फोन येत राहिले तेव्हा मात्र नुपूर महोदयांना अक्षयनी सांगितले की, ‘मला जर तुम्ही तुमच्या ब्रोकिंग कंपनीच्या लेटर हेडवर लिहून देत असाल की ‘दर महिन्याला खात्रीपूर्वक दोन टक्के परतावा देऊ’ तर मी पसे ठेवतो. मात्र तसे करायला नकार दिला गेला. कारण सेबीकडे नोंदणी केलेला कुणीही ब्रोकर अथवा सब ब्रोकर अशाप्रकारे हमीपूर्वक परतावा देण्याचे वचन देऊ शकत नाही. आणि लोभापायी नुपूर महाशयांनी खरेच तसे लिहून दिले असते तर पुढील उत्तरपूजा कशी बांधायची हे अक्षयना मी सांगणार होतोच. अशा अपप्रवृत्तीमुळे शेअर बाजार बदनाम होतोय.
दुसरे एक गृहस्थ ‘स्फोटक फिणद्र’ (पुन्हा नाव बदलले कारण कायदेशीर कटकटी मला नको आहेत अन्यथा भाषणे द्यायचे बंद करून हेच काम करीत बसावे लागेल!) या दलालाच्या तावडीत सापडले. ट्रेिडग खाते मोफत, डिमॅट खाते मोफत वगरे प्रलोभने दाखवून त्याना आपल्या कार्यालयात बोलावून विविध खाती उघडण्याचे अर्ज त्यांच्यासमोर ठेवले. फुल्या मारल्या व सह्या करायला सांगितले. सदर गृहस्थ माझ्या कार्यक्रमाला अनेकवेळा आले होते त्यामुळे न वाचता सह्या करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. दोन दिवस घरी ते कागद घेऊन नीट वाचले तेव्हा असे लक्षात आले की, ब्रोकर म्हणून त्यांच्याकडे १४ हजार रुपये कायमस्वरूपी ठेव ठेवावी लागेत. वास्तविक प्रत्यक्ष बोलणे झाले त्यावेळी ‘स्फोटक’च्या माणसाने बँकेत १४ हजार रुपये बचत खात्यात जमा ठेवावे लागतील असे सांगितले होते! शब्द बापुडे केवळ वारा! फरक असा की बचत खात्यात ठेवलेल्या १४ हजार रुपयांवर किमान चार टक्के व्याज तरी मिळेल पण ब्रोकरकडे ठेवलेल्या १४ हजार रुपयांवर काहीही मिळणार नाही! सदर गृहस्थानी ‘स्फोटक’च्या माणसाला माझा फोन जोडून दिला आणि माझ्याशी बोलायला सांगितले. त्यावर महाशय मला सांगते झाले की, आमच्या कंपनीचा तो नियम आहे! वा रे तुझी कंपनी. सेबीने स्पष्टपणे सांगितले आहे की, डिपॉझिट ठेवण्यासाठी ब्रोकर ग्राहकावर सक्ती करू शकत नाही; मुखत्यार पत्र देण्यासाठी सक्ती करू शकत नाही. या गोष्टी केवळ ऐच्छिक आहेत. या नियमांची जाणीव करून देताच तो प्रतिनिधी वरमला आणि चरफडत निघून गेला. छोटय़ा छोटय़ा बाबी जाणून न घेता लोक अशा प्रकारे आपले पसे अडकवून बसतात. खात्रीशीर परताव्याचे आमिष म्हणजे शुद्ध लोणकढी थाप असते याचे भान ठेवले पाहिजे.

‘सुरक्षा जाळी’ काय आहे?
मागील एक लेखात सेबीद्वारे प्रस्तुत ‘सुरक्षा जाळी यंत्रणा’ या विषयी ओझरता उल्लेख आला होता. त्याविषयी अनेक लोकांनी विचारले आहे. याची माहिती सेबीच्या वेबसाइटवर आहेच पण सर्वाना ते पाहणे जमेलच असे नाही म्हणून लिहितो. गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांच्या बाबतीत अशी स्थिती झाली होती की, त्या कंपनीचे आयपीओमध्ये समभाग ज्या किंमतीला गुंतवणूकदाराने विकत घेतले होते त्याहून कमी किंमतीला ते नोंदणीच्या दिवशीच नव्हे तर त्यानंतरही अनेक महिने उपलब्ध होते!! एक प्रकारे हे गुंतवणूकदारांचे नुकसानच म्हटले पाहिजे. असे प्रकार होऊ नयेत म्हणून सेबीने एक व्यवस्था सुचविली आहे ती म्हणजे उपरोक्त ‘सुरक्षा जाळी’. जर अशा प्रकारे बाजारातील त्या शेअरचा भाव वितरीत (Allotment) किंमतीहून कमी असेल तर कंपनीच्या प्रवर्तकांनी मूळ भागधारकांकडून जास्तीत जास्त एक हजार शेअर्स वितरीत किंमतीला (Allotment price) विकत घ्यायचे. शेअर्स वितरीत झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत हे करणे बंधनकारक असेल. अर्थात ज्याला ते शेअर्स ‘आयपीओ’मध्ये मिळाले होते तोच भागधारक यासाठी पात्र असेल. जर का त्याने ते शेअर्स अन्य कुणाला विकले असतील तर ती दुसरी व्यक्ती या लाभासाठी पात्र नसले. व्यक्तिगत स्वरूपात निवासी भारतीय गुंतवणूकदारालाच याचा लाभ मिळावा अशी योजना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2013 1:23 am

Web Title: innocent investor and maligner mentality people in share market
Next Stories
1 कार्डाद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवहार; मर्यादा पाळण्याचे बँकांना आवाहन
2 एलआयसीची ‘जीवन सुगम’ पारंपरिक विमा योजना
3 निर्मलकडून ठाण्यात स्वास्थवर्धक ‘स्पोर्ट सिटी’ गृहसंकुल
Just Now!
X