25 January 2021

News Flash

नवीन ‘जीएसटी’ सुधारणांमुळे कापडाच्या किमती कमी होतील

निर्यातीलाही चालना मिळण्याचा कापड उद्योजकांना विश्वास

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

निर्यातीलाही चालना मिळण्याचा कापड उद्योजकांना विश्वास

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेने अलिकडे झालेल्या बैठकीतून पुढे आलेल्या सुधारणांच्या परिणामी, कापड उत्पादकांना आधी कच्चा मालासाठी भरलेल्या कराचा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’अंतर्गत परतावा मिळविता येणार आहे. या निर्णयाच्या परिणामी कापडाच्या किमती कमी होतील, असा या क्षेत्रातील उद्योजकांनी विश्वास व्यक्त केला आहे.

जीएसटी परिषदेकडून गेल्या आठवडय़ात घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे वस्त्रोद्योगाला मरगळ झटकून, भरभराटीसाठी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया कापड निर्यातदारांची संघटना ‘टेक्सप्रोसिल’चे अध्यक्ष उज्ज्वल लाहोटी यांनी व्यक्त केली. उत्पादकांना कच्चा मालावर कर परतावा मिळवून देणे, हा जीएसटी परिषदेने घेतलेला एक लक्षणीय निर्णय आहे. परिणामी निर्यात बाजारपेठेत भारतीय वस्त्रप्रावरणे अधिक स्पर्धात्मक बनतील आणि देशांतर्गत कापडाच्या किमती कमी होतील, असे मत लाहोटी यांनी व्यक्त केले.

जीएसटी परिषदेतर्फे  रेशमी धागे (रेशीम कापड), हाताने बनवलेल्या नाडय़ा, दोऱ्या (लेस), हाताने विणलेले वेलबुट्टीचे कापड, हाताने बनवलेले गोफ, कापडात ओवलेली आभूषणे, हाताने बनविलेले गालिचे आणि अन्य हाताने बनवलेले कापड इत्यादी कापडाच्या वस्तूंवरील जीएसटीचा दर १२ टक्कय़ांवरून ५ टक्के केला आहे. लाहोटी यांच्या मते, मुख्यत: लघु आणि मध्यम उद्योगाकडून निर्मित या वस्तू आहेत आणि त्यावरील करकपातीमुळे त्यांना मोठी चालना मिळेल.

कर विवरणाच्या पद्धती सुलभता तसेच तिमाही कर विवरणासाठी पात्र उद्योजकांसाटी वार्षिक उलाढालीचे प्रमाण १.५ कोटी रुपये ते ५ कोटी रुपयांपर्यंत वाढविल्याने कापड उद्योगातील ९३ टक्के करदात्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय रिव्हर्स चार्ज यंत्रणेला सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ हाही निर्णय दिलासादायी असल्याचे लाहोटी यांनी स्पष्ट केले. तथापि, निर्यातदारांना भांडवली मालासाठीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा परतावा, अनुमानित निर्यातीअतंर्गत स्थानिक पुरवठा झाला असेल अशा निर्यातीवरील आयजीएसटीचा भरणा, निर्यातीवरील ट्रान्झिशनल क्रेडिटचा परतावा अशा क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 1:27 am

Web Title: input tax credit gst
Next Stories
1 इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत आता ३१ जुलै ऐवजी ३१ ऑगस्ट
2 फक्त दोन तासात मार्क झकरबर्गच्या 17 अब्ज डॉलर्सचा चुराडा
3 फेसबुकला ऐतिहासिक दणका, 20 टक्क्यांनी कोसळला शेअरचा भाव
Just Now!
X