निवडक बँकेतर वित्तीय कंपन्या आणि नागरी सहकारी बँकांच्या अंतर्गत लेखापरीक्षण प्रणालीच्या गुणवत्ता आणि परिणामकारकतेत वाढीचे उद्दिष्ट राखून रिझव्‍‌र्ह बँकेने जोखीम-आधारित अंतर्गत लेखापरीक्षण प्रणाली स्थापित करण्यासाठी बुधवारी मार्गदर्शनपर निर्देशांची घोषणा केली.

ठेवी स्वीकारणाऱ्या सर्व आणि ५,००० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्या बँकेतर वित्तीय कंपन्या, ५०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय असणाऱ्या नागरी सहकारी बँकांना नवीन प्रणालीचा अवलंब करणे भाग ठरेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले. नागरी बँका व वित्तीय कंपन्या रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियंत्रित केल्या जात असल्या तरी सध्याच्या घडीला त्यांच्याकडून अंतर्गत लेखापरीक्षण त्यांच्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते.