News Flash

विमा दावे वाढणार

करोना उद्रेक : पाच महिन्यांत भरपाईसाठी एक हजार दावे

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणू साथीने जीव गमाविलेल्यांच्या संख्येने भारतात ५० हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी विमा कंपन्यांकडे आतापर्यंत १,००० दावे भरपाईसाठी दाखल झाले आहेत.

एकू ण विम्याच्या दाव्यापोटी पाच महिन्यांत विमा कंपन्यांनी ६६,७००  दावे भरपाई केली असून पैकी ६६,१०० कोटींचे दावे करोना संबिंधत आहेत. कंपन्यांना करोना संबंधित १०.३ लाख दावे प्राप्त झाले असून दाव्यापोटी कंपन्यांना १,५६० कोटीची भरपाई करावी लागेल. पैकी निम्मे दावे स्वीकारण्यात आले असून उर्वरित दावे औपचारिकतेअभावी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

जूनमध्ये दाखल झालेल्या ६,५०० दाव्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये १.४० लाख दावे दाखल झाले आहेत. भारतात उपचारादरम्यान वापरलेल्या वस्तूंची भरपाई विमा कंपन्या करत नसल्याने दाखल झालेल्या दाव्यापैकी उपचारात वापरण्यात आलेल्या ‘पीपीई’कीटसारख्यांच्या खर्चाची मंजुरी होत नसल्याने दाव्यापोटी स्वीकारलेली कोविड विशेष विम्याव्यतिरिक्त दाखल झालेल्या दाव्यांसाठी किमान ३५ टक्के  रक्कमेची स्वीकृती होणार नाही.

१,००० मृत्यू दाव्यांपोटी पैकी ५० कोटी रुपयांचे दावे स्वीकारण्यात आले आहेत.

देशातील एका सर्वात मोठय़ा विमा कंपनीकडे ६९३ विमा योजनेंतर्गत २९३ दावे दखल झाले असून सरासरी दरडोई ५.५० लाखांचे दावे असल्याचे कं पनीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले.

आरोग्यनिगा क्षेत्राची महिन्यात २६ टक्याने वाढ

कोविड-१९ मुळे देशातील एकू णच आरोग्यनिगा क्षेत्र गेल्या महिन्यात २६ टक्याने वाढले असून परिणामी सजगता म्हणून रुग्ण, नातेवाईक, ग्राहकांकडून अधिक प्रमाणात क्षेत्राशी निगडित सेवा व उत्पादने घेतली जात आहेत. या दरम्यान आरोग्य निगा उत्पादने निर्माते तसेच विमा योजना कं पन्यांच्या जाहिरातीचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. भारतात मार्चच्या अखेरिस करोना साथ सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जुलैपर्यंत आरोग्यनिगा क्षेत्र तसेच या क्षेत्राशी संबंधित जाहिरातींचे प्रमाण कोविड-१९ पूर्वच्या प्रमाणात कमालीने घसरले होते. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये (आतापर्यंत) ते वेगाने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. बार्क इंडियानुसार, ११ ते ३१ जानेवारी दरम्यान विम्याच्या जाहिराती सरासरी प्रति सेकं द संख्या २.२४ लाख होती. १४ मार्च ते ५ जून दरम्यान (कठोर टाळेबंदी) ती ६० हजारापर्यंत आली. तर ११ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान ती पुन्हा वाढून सरासरी प्रति सेकंद १.९९ लाखपर्यंत पोहोचली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:01 am

Web Title: insurance claims will increase due to corona abn 97
Next Stories
1 चक्क ५ रूपयांत खरेदी करता येणार सोनं; ‘या’ नव्या सेवेला सुरूवात
2 मौद्रिक आयुधांचा भविष्यात सबुरीने वापर
3 रिझव्‍‌र्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नरपदाचा उमेदवार आज ठरणार!
Just Now!
X