‘अँम्फी’चा निष्कर्ष : निधी ओघमुळे मालमत्तेत लहान शहरांच्या टक्केवारीत वाढ

निश्चलनीकरणामुळे आणि रिझव्‍‌र्ह बँकेने वर्षभरात केलेल्या रेपोदर कपातीमुळे बँकांनी ठेवी दरात १ ते १.५ कपात केली. परिणामी परंपरागत बँकांच्या मुदतठेव करणारे ठेवीदार अधिक नफ्यासाठी म्युच्युअल फंडांकडे वळल्याने म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत तळाच्या १५ शहरातील (बी—१५)  मालमत्तेत वाढ झाली आहे.

म्युच्युअल फंडाची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०१६ अखेरीस बी—१५ मधील २.८१ लाख कोटी वसलेली मालमत्ता  नोव्हेंबर २०१७ मध्ये वाढून ४.१० लाख कोटी झाली आहे.

या आकडेवारीतून अनेक रंजक बाबी विश्लेषकांसमोर आल्या आहेत. ‘बी १५’मधील एकूण मालमत्तेच्या ५८ टक्के मालमात्त समभाग गुंतवणूक आहे तर आघाडीच्या ‘टी-१५’ मधील एकूण मालमत्तेच्या ३४ टक्के मालमत्ता समभाग गुंतवणूक आहे. समभाग गुंतवणुकीतील एकूण मालमत्तेच्या ९ टक्के मालमत्ता मध्यस्थवगळून केली असल्याचे समोर आले आहे.  तर रोखे गुंतवणुकीपैकी ४१.७० टक्के मालमत्ता मध्यस्थाविना केलेली आहे.

रोखे गुंतवणुकीत मुख्यत्वे कंपन्या आणि संस्थात्मक गुंतवणूकदार मध्यस्थ वगळून करीत असल्याने काही योजनांच्या मालमत्तेत थेट गुंतवणुकीचे अधिक प्रमाण आढळते. नोव्हेंबर २०१७ अखेरीस म्युच्युअल फंडाच्या माल्मात्तेने २२ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. फंड गंगाजळीचा हा विक्रम आहे.

‘अ‍ॅम्फी’चे अध्यक्ष आणि आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचे अध्यक्ष ए. बालसुब्रमण्यम यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘अ‍ॅम्फी’तर्फे राबविले गेलेल्या ‘म्युच्युअल फंड सही है’ या प्रसारमोहिमेला लाभलेल्या यशामुळे गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड या संकल्पाने बाबत कुतूहल निर्माण झाले असून प्रत्येकाला आपण एकदातरी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून पाहावी असे त्यांना वाटू लागले आहे. या प्रसारमोहिमेला लाभलेल्या भूतपूर्व यशामुळे आम्ही प्रभावित झाले आहोत. लवकरच आम्ही नवीन ध्वनीचित्रफीतीच्या प्रसाराला सुरवात करणार आहोत, असेही ते म्हणाले.

‘सीडीएसएल’च्या अर्थसाक्षरता विभागाचे प्रमुख अजित मंजुरे यांनी ‘लोकसत्ता’ला याबाबत सांगितले की, जानेवारी ते डिसेंबर २०१७ दरम्यान म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत ३२ टक्के वाढ झाली आहे. सेबीच्या आदेशानुसार बीएसई, एनएसई वेगवेगळे म्युच्युअल फंड, आणि आमचे डिपॉझिटरी पार्टीसिपंट्स यांना सोबत घेऊन अर्थसाक्षरतेसाठी कार्यशाळा घेत असतो. अनेकदा आमच्या या कार्यशाळेत सेबीचे अधिकारीसुद्धा मार्गदर्शन करतात. या कार्यशाळा मुख्यत्वे तालुका किंवा जिल्हा पातळीवर होत असतात. म्युच्युअल फंडात लहान शहराचा गुंतवणूक टक्का वाढण्यामध्ये आमच्या या कार्यशाळांचा खारीचा नक्कीच वाटा आहे. गुंतवणूकदारांच्या मनात असली समभाग गुंतवणुकीबद्दलची भिती अर्थसाक्षरतेमुळे कमी होते, असा आमचा अनुभव आहे, असेही ते म्हणाले.