News Flash

यंदाही व्याजदर स्थिरच!

मान्सूनचा अंदाज सकारात्मक वर्तविण्यात आला असून यामुळे कृषी क्षेत्राची कामगिरी उल्लेखनीय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (संग्रहित छायाचित्र)

 रिझर्व्ह  बँकेचे वाढती महागाई आणि घसरत्या विकास दरामुळे सावध पाऊल

मुंबई : करोना साथ प्रसार, टाळेबंदीसारखे निर्बंध यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या गतीला चालना देण्यासाठी  रिझर्व्ह  बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहे. वाढत्या महागाईचा दर चढा असल्यानेही यंदादेखील व्याजदरात कोणताही बदल न करण्याचे धोरण गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

दास यांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर करताना सलग सहाव्यांदा प्रमुख रेपो दर स्थिर ठेवले. सध्याचा ४ टक्के रेपो दर हा किमान स्तरावरील आहे. यामुळे लगेचच व्यापारी बँकांकडूनही गृह, वाहन आदी कर्जावरील व्याजदर कमी केले जाण्याची शक्यता नाही. तसेच ठेवींवरही अधिक व्याज मिळण्याचा मार्गही दृष्टिक्षेपात नाही.

अर्थव्यवस्थेत, व्यापारी बँकांकडे बँकांकडे रोकड सुलभता पुरेशी असल्याकारणाने सरकारी बँकांनी व्याजदर घटविल्यास अन्य बँकांही त्याचा कित्ता गिरविण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मान्सूनचा अंदाज सकारात्मक वर्तविण्यात आला असून यामुळे कृषी क्षेत्राची कामगिरी उल्लेखनीय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर सुधार दिसत असून यामुळेदेखील भारतातील उत्पादन व सेवा यांची मागणी वाढेल, असे निरिक्षण गव्हर्नर दास यांनी पतधोरण जाहीर करताना नोंदविले.

 रिझर्व्ह  बँकेच्या पतधोरण आढाव्याची वैशिष्ट्ये :

’  रेपो दर ४ टक्के स्थिर; रिव्हर्स रेपो तूर्त ३.३५%

’  बँक रेट व एमएसएफ ४.२५ टक्के

’  अर्थव्यवस्था वाढीचा दर १०.५% ऐवजी कमी करत ९.५%

’  आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये चलनवाढीचे दर उद्दिष्ट ५.१%

’  करोनाची दुसरी लाट मर्यादित; दुसऱ्या अर्ध वित्त वर्षात मागणी वाढण्याची अपेक्षा

’  परकीय गंगाजळी ६०० अब्ज डॉलर पुढे जाण्याचा विश्वाास

’  पतधोरण पूर्ववत करण्याची योग्य वेळ नसल्याचे समर्थन

’  आदरातिथ्य क्षेत्राला १५,००० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य निधी कर्जावर उपलब्ध करून देणार

वैश्विाक महासाथीच्या दुसऱ्या लाटेच्या पाश्र्वाभूमीवर  रिझर्व्ह  बँकेने योग्य वेळी पुन्हा एकदा देशाच्या आर्थिक वाढीसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय अपेक्षेप्रमाणे आहे आणि विकास वाढीची अनिश्चिातता तसेच महागाईच्या आव्हानावर लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने मांडली गेली आहे.

अर्थव्यवस्थेत १५,००० कोटी रुपयांची रोकड तरलता उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे हॉटेल, नागरी विमान सेवा तसेच आर्थिक फटका बसलेल्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मदत होईल.

– मल्लिकार्जुन राव, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, पंजाब नॅशनल बँक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 1:28 am

Web Title: interest rates stable rising inflation of the reserve bank akp 94
Next Stories
1 भारताच्या सागरी खाद्यान्न निर्यातीला फटका
2 प्रमुख निर्देशांकांची विक्रमापासून माघार
3 निप्पॉन इंडिया फार्मा फंडाचा ५,००० कोटींचा टप्पा
Just Now!
X