30 September 2020

News Flash

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी

अमेरिकी अध्यक्षपदाचा निकाल एक दिवसावर आला असताना आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात तेजी नोंदली गेली.

अमेरिकी अध्यक्षपदाचा निकाल एक दिवसावर आला असताना आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात तेजी नोंदली गेली. नव्या सप्ताहाची सुरुवात आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी दीड टक्क्य़ांपर्यंतची वाढ नोंदविली. यामध्ये जपानचा निक्केईल, शांघाय कंपोझिट, हाँग काँगचा हँग सेंग यांचा समावेश होता. तर युरोपीय बाजारातही फ्रँकफ्रंटचा डॅक्स १.७१ टक्क्य़ाने, लंडनचा एफटीएसई १.३७ टक्क्य़ाने, पॅरिसचा कॅक १.८१ टक्क्य़ाने सुरुवातीची वाढ नोंदवित होते.

अमेरिकी अध्यक्षपदाचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन व रिपब्लिकनचे डोनल्ड ट्रम्प यांच्यातील सामना कट्टर होत आहे. त्यातच सोमवारी अमेरिकी तपास यंत्रणा एफबीआयचे प्रमुख जेम्स कोमे यांनी हिलरी यांना इमेल प्रकरणात कोणत्याही तपासाचा सामना करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले.

अमेरिकेतील नॅसडॅकसह प्रमुख निर्देशांकांची सुरुवात काहीशा घसरणीने झाली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सायंकाळी ७ वाजता हा निर्देशांक ०.२४ टक्क्य़ांनी खाली होता.

जगभरातील भांडवली बाजाराची नजर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे आहे. त्यातच सोमवारी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना इ-मेल वापराबाबतच्या तपासात तपास यंत्रणेची ‘क्लिन चिट’ मिळाल्याचे पडसादही तूर्त बाजारावर उमटलेले दिसले. येथे औषधनिर्माण, बँक समभागांनी बाजाराला साथ दिल्याचे दिसले.

– विनोद नायर,, प्रमुख संशोधक, जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2016 2:40 am

Web Title: international markets rapidly goes
Next Stories
1 इंडियन हॉटेल्सच्या संचालकांकडून सायरस मिस्त्री यांची पाठराखण
2 रिलायन्स दणका; १.५५ अब्ज डॉलरच्या भरपाईची मागणी
3 व्याजदर कपातीची चढाओढ ‘इंडियाबुल्स हाऊसिंग’कडूनही
Just Now!
X