सहकार क्षेत्रातील आघाडीच्या कल्याण जनता सहकारी बँकेने सुरुवात केलेल्या इंटरनेट व मोबाईल बँकिंग सेवेमुळे बँकेच्या खातेदारांना आता विविध सेवांबरोबरच निधी हस्तांतरणाची सोयही उपलब्ध झाली आहे.
बँकेच्या इंटरनेट व मोबाईल बँकिंग सुविधेमुळे ग्राहकांना बँक ठेवी, देयक भरणा, जमा खाते चौकशी, धनादेश मागणी आदी सेवा अहोरात्र घेता येतील.
बँकेच्या उपरोक्त दोन्ही सेवांची सुरुवात शनिवारी कल्याण येथे मुंबई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयआयटी) संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. दीपक फाटक व परसिस्टंट सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, उपाध्यक्ष मधुसूदन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर, संचालक मोहन आघारकर, प्रा. वसंत काणे, प्रा. विलास पेणकर आदी यावेळी उपस्थित होते.
१९७३ ची स्थापना असलेल्या कल्याण जनता सहकारी बँकेच्या महाराष्ट्रात ३२ शाखा आहेत.

pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश