20 February 2019

News Flash

जागतिक कारणांमुळे वर्तमानात सुधारणा; गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नाही!

गुंतवणूकदार बहुतेकदा सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे योग्य प्रकारे मालमत्तांचे वर्गीकरणाकडे लक्ष न देणे.

भारतीय समभागांच्या मूल्यांमध्ये होत असलेली दुरुस्ती ही जागतिक बाजारात होत असलेल्या दुरुस्तीमुळे होत आहे. असे असले तरी पुढील १० वर्षांकरिता ही मोठी घटना असेल.

आपण जागतिक बाजराच्या तेजीत आहोत जिथे डो जोन्ससारख्या निर्देशांकांनी दहा ते पंधरा दिवसात १,००० अंशांची वधारणा नोंदविली. भारतीय बाजारातसुद्धा अर्थसंकल्प सादरीकरणाआधी एक महिना मोठय़ा प्रमाणावर वाढ बघायला मिळाली. यात काही निर्देशांकामध्ये ६% वाढ जानेवारी २०१८ मध्ये बघायला मिळाली. स्पष्टपणे बघितल्यास जानेवारीपर्यंत जागतिक बाजारात अवाजवी खरेदी झाली.

हे सांगणे कठीण आहे की, बाजारात आणखी दुरुस्ती होईल की नाही; कारण अमेरिकी बाजारपेठा २००९ ते २०१८ दरम्यान सतत तेजीतच राहिल्या आहेत. गुंतवणूकदार बहुतेकदा सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे योग्य प्रकारे मालमत्तांचे वर्गीकरणाकडे लक्ष न देणे.

मिळकतीचे चक्र भारतात दिसणे अद्यापही बाकी आहे आणि पुढील १८ महिन्यात वाढ बघायला मिळेल. पुढील १८ महिन्यात कंपन्यांच्या तिमाही नफ्यात सुधारणा दिसून येईल. यामुळे विविध क्षेत्रात क्षमतावापर वााढले.

बाजारातील मूल्यनिर्धारण आता स्वस्त नाही. त्यामुळे सध्या काळजी घेणे आणि संपत्तीचे वर्गीकरणाचे पालन करणे गरजेचे आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये बाजारात तेजी राहिली आहे आणि त्याकाळात आलेल्या गुंतवणूकदारांना अद्याप घसरण बघायला मिळालेली नाही. समभाग हे जोखीम नसलेले दायित्व आहेत अशा धारणेने ते समभागांमागे धावले आहेत असे दिसून येईल जी चिंतेची बाब आहे.

क्षेत्रानुसार पायाभूत सुविधा, ऊर्जा, सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि औषधनिर्माणबाबत  आशावादी राहायला हरकत नाही.

डायनामिक असेट अलोकेशन फंड्स, लार्ज कॅप फंड्स आणि क्रेडिट फंड्स (डेट) हे गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय वाटतात. डायनामिक असेट अलोकेशन फंड्स निवडायचा सल्ला देण्यास काहीही वावगे वाटत नाही. ते पूर्ण समभागापेक्षा जास्त सरस आहेत. गुंतवणूक सुरवात न केलेल्यांसाठी डायनामिक असेट अलोकेशन फंड्स हे असे फंड्स आहेत ज्यात इक्विटी आणि डेट या दोघांनाही त्यांच्या मालमत्ता वर्गाच्या आकर्षकतेनुसार स्पर्श केलेला असतो.

मूल्यधारणेच्या दृष्टीने स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारात अतिमूल्यांकन झाले आहे, असे वाटते. तुलनात्मकदृष्टय़ा लार्ज कॅप फंड्स हे जास्त आकर्षक पर्याय ठरतात. लार्ज कॅप हे तसे इतर समभागांच्या तुलनेत कमी अस्थिरता असलेले असतात.

डेट प्रकारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकरात अतिमूल्यांकन झाले आहे. असे फंड्स परतावे प्रत्यक्ष मिळकतीच्या स्वरुपात आणि संभावित भांडवली अधिमूल्यनातून निर्माण करायचा प्रयत्न करतात.

याबरोबरच, एखाद्याने आहे त्या एसआयपीबरोबर टिकून राहावे आणि बाजारातील अस्थिरतेने डगमगू नये.

निमेश शाह, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड.

First Published on February 13, 2018 1:30 am

Web Title: investment global market