11 August 2020

News Flash

ईटीएफ : ‘मिलेनिअल्स’चा आदर्श गुंतवणूक पर्याय

भारतात विविध फंड घराण्यांचे ‘ईटीएफ’ पर्याय उपलब्ध आहेत.

लीना गोखले

गुंतवणुकीतील यशाचे गमक योग्य मालमत्ता विभाजन हे आहे. परताव्यापेक्षा गरजेनुसार केलेल्या फंडांची निवड गुंतवणूकदाराला वित्तीय साध्यापर्यंत नेण्यास मदत करते. वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांचे योग्य प्रमाण असलेला असलेल्या पोर्टफोलिओला आदर्श गुंतवणूक समण्यात येते.

जोखीम कमी करण्यासाठी बचावात्मक रणनीती वापरण्यात येते. समभाग गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्याची एक ज्ञात पद्धत म्हणजे निर्देशांकाधारित इंडेक्स फंडात किंवा ‘इटीएफ’मध्ये गुंतवणूक करणे. ‘इटीएफ’ अर्थात ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड्स’ त्या निर्देशांकांचे प्रतिबिंब असते. ‘ईटीएफ’च्या माध्यमातून विविध उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करून म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वैविध्य आणता येते.

भारतात विविध फंड घराण्यांचे ‘ईटीएफ’ पर्याय उपलब्ध आहेत.

एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) मध्ये अशी अनेक वैशिष्टय़े आहेत जी ही गुंतवणूक तरुण गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श पर्याय आहे. पहिले कारण एक्सचेंज ट्रेडेड फंडामुळे तुलनेने कमी रक्कम गुंतवणूक करून वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे शक्य होते. याव्यतिरिक्त, ‘ईटीएफ’मध्ये दिवसभर व्यवहार होत असतात. या फंड प्रकारात पुरेशी रोकड सुलभता असल्याने गुंतवणूक आणि निर्गुंतवणूक सहज शक्य आहे. महत्वाचे म्हणजे सर्वात कमी मालमत्ता व्यवस्थापन शुल्क आकारले जाते. या व अशा अनेक कारणांनी तरुण गुंतवणूकदारांनी ‘ईटीएफ’चा गुंतवणुकीसाठी विचार करण्याची आवश्यकता आहे.

व्यावहारिकरित्या प्रत्येक मालमत्ता वर्ग – समभाग, रोखे, चलन, जिन्नस आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसह कोणत्याही मालमत्तांच्या विविध साधनांत गुंतवणूक करणारे ‘ईटीएफ’ अस्तित्वात आहेत.

एखादा तरुण गुंतवणूकदार ५० हजार ते १ लाखाच्या गुंतवणुकीतून मायक्रोसॉफ्ट किंवा अ‍ॅमेझॉनसारख्या अमेरिकेतील मेगाकॅप कंपनीच्या व्यवसायाचा हिसा बनू शकतो. किंवा सोने परकीय चलन (करंसी बास्केट) या सारख्या मालमत्तांत गुंतवणूक करू शकतो. बहुतेक ‘ईटीएफ’ रोकड सुलभ असतात आणि बाजाराच्या कालावधीत व्यवहार सुरु असल्याने गुंतवणूक मूल्य व्यवहाराच्या कालावधीत उपलब्ध असते.

वित्तीय बाजारपेठेशी पूर्णपणे परिचित न झालेले तरुण गुंतवणूकदार बाजारपेठेचा हिस्सा ‘ईटीएफ’च्या माध्यमातून बनू शकतात. गुंतवणूकदारांना ‘ईटीएफ’ची इतर काही वैशिष्टय़े जी त्यांना तरुण गुंतवणूकदारांसाठी आदर्श गुंतवणूक साधने बनविते त्यात विविधता, तरलता, कमी शुल्क, गुंतवणूक व्यवस्थापन निवड आणि नवीनता यांचा समावेश आहे.

(लेखिका वित्तीय नियोजक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 2:35 am

Web Title: investment option from millennials investment plans for millennials zws 70
Next Stories
1 करोना-टाळेबंदी मुळावर : मारुती सुझुकीवर नुकसान नामुष्की
2 गुंतवणूकदारांची नफे खोरी; सेन्सेक्स, निफ्टीची माघार
3 टाळेबंदीसंबंधी अनिश्चितता दूर करा – सीआयआय
Just Now!
X