आयफोन कंपनीचा ६ श्रेणीतील मोबाईल फोन अखेर भारतात अवतरणार असून मंगळवारच्या मध्यरात्री १२ वाजता तो निवडक संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत अमेरिकेतील याच फोनच्या तुलनेत मात्र १० ते १७ टक्क्य़ांनी अधिक आहे. संकेतस्थळ व दालन नोंदणीनंतर प्रत्यक्षात हा मोबाईल दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांच्या हातात येणार आहे.
आयफोन६ आणि आयफोन६ प्लस या नावाने हा मोबाईल क्षमतेबाबत तीन विविध प्रकारात असेल. १६ जीबी, ६४ जीबी व १२८ जीबी किंमत असलेल्या आयफोन६ ची किंमत अनुक्रमे ५३,५००, ६२,५०० व ७१,५०० रुपये असेल.
तर आयफोन६ प्लसची किंमत ६२,५००, ७१,५०० व ८०,५०० रुपये असेल. भारतात यापूर्वी ५३,५०० रुपयांना सादर करण्यात आलेल्या आयफोन५एसची किंमत आता अनेक संकेतस्थळांवर ३० हजार रुपये दिसते.
अ‍ॅमेझॉन या इ-कॉमर्स संकेतस्थळावर मोबाईलची किंमत ७५० डॉलर म्हणजेच ४६ हजार रुपये दाखविण्यात येत आहे. तुलनेत भारतात ही किंमत अधिक आहे.
या फोनची नोंदणी मंगळवार मध्यरात्रीपासून सुरू होत असून प्रत्यक्ष दालनांमध्ये हा फोन १७ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. संकेतस्थळा व्यतिरिक्त देशभरातील २४ शहरांमधील १,२०० दालनांमधून हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आयफोन६ ची वैशिष्टय़े :
        आयफोन ६        आयफोन६ प्लस    
स्क्रीन        ४.७ इंच            ५.५ इंच
जाडी        ६.९ मिमी            ७.१ मिमी
किंमत        रु. ५३,५०० ते ७१,५००    रु. ६२,५०० ८०,५००
(दोन्ही प्रकारच्या मोबाईलमध्ये कॅमेरा ८ व १.२ मेगापिक्सल व साठवणूक क्षमता अशी एकाच रचनेची देण्यात आली आहे.)