भांडवली बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणामुळे भागविक्री प्रक्रियेमार्फत (आयपीओ) कंपन्यांनी गेल्या वर्षांत केवळ १,६१९ कोटी रुपये उभारले असून गेल्या दशकातील ही नीचांक पातळी आहे. याबाबत ‘प्राइम डेटाबेस’ने जारी केलेल्या माहितीत २०१३ मध्ये केवळ तीन कंपन्यांनीच भांडवल उभारणीसाठी आयपीओ माध्यमाचा उपयोग केला.
२०१२ मध्ये ११ कंपन्यांच्या आयपीओद्वारे तब्बल ६,८३५ कोटी रुपये उभारले गेले होते. तर यापूर्वी २००१ मध्ये किमान २९६ कोटी रुपयेच या प्रक्रियेतून जमा झाले होते. २०१० मध्ये सर्वोच्च अशा ३७,५३५ कोटी रुपयांची निधी उभारणी या माध्यमातून झाली. गेल्या वर्षांत भांडवली बाजारातील लघु व मध्यम उद्यमाच्या व्यासपीठावरून ३५ आयपीओने ३३५ कोटी रुपये जमा केले आहेत.
चालू आर्थिक वर्षांमध्ये या प्रक्रियेसाठी घोषणा करणाऱ्या कंपन्यांची संख्या मात्र तब्बल ९१५ होती. पैकी १४ कंपन्या ३,६३५ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. अद्याप त्यांना सेबीची परवानगी मिळालेली नाही, तर १० कंपन्यांच्या ३,१०० कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीच्या प्रस्तावासही अद्याप प्रतीक्षा आहे.
२०१३ मधील आयपीओ उभारणी
कंपनी                                निधी उभारला         अर्ज भरणा
           (कोटी रुपये)    
जस्ट डायल                                     ९१९            १.५३ लाख
रेप्को होम्स फायनान्स                     २७०           ४,५४९
व्ही-मार्ट रिटेल                                 ९४             ११,९६३