मुंबई : ठाणेस्थित राजश्री पोलीपॅक लिमिटेड कंपनीची प्रारंभिक खुली भागविक्री येत्या १० सप्टेंबरपासून खुली होत असून, ती १२ सप्टेंबरला संपुष्टात येईल. या प्रस्तावात प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्याच्या २९,६०,००० समभागांची प्रत्येकी ११९ ते १२१ रुपये किंमतपट्टय़ादरम्यान विक्री होणार असून, कमाल ३५.८२ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लघू व मध्यम कंपन्यांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ या बाजार मंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या या भागविक्रीत सहभागासाठी गुंतवणूकदारांना किमान १,००० समभाग आणि त्यापुढे १,००० समभागांच्या पटीत बोली लावता येईल.

एकंदर १०० पेक्षा जास्त उत्पादने असणारी आणि वार्षिक १०,००० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असणाऱ्या राजश्री पॉलीपॅकने, दमन येथे चौथा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक भांडवल या भागविक्रीद्वारे मिळविण्याचे प्रस्तावित केले आहे.  फॅक्टरी युनिट उभारण्याकरिता अर्थपुरवठा करण्यासाठी राजश्री पोलीपॅक हा आयपीओ आणत आहे. गेल्या चार वर्षांत, कंपनीने महसुलात १९.९७ टक्के वार्षिक सरासरी दराने तर, निव्वळ नफ्यामध्ये १३४.६६ टक्के वार्षिक सरासरी दराने वाढ साध्य केली आहे. पीएल कॅपिटल मार्केट्स या भागविक्रीची प्रधान व्यवस्थापक आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipo of rajshree polypack limited opens from september
First published on: 05-09-2018 at 01:46 IST