देशातील आघाडीचे स्थानिक सेवा-उत्पादनांची इंटरनेटवरील सर्च इंजिन असलेल्या ‘जस्ट डायल’ची संगणकीय पायाभूत सुविधा आयबीएमच्या स्मार्ट कॉम्प्युटिंग प्रणालीने समर्थ बनविण्यात आली आहे. तब्बल ७७ लाख सेवा उत्पादनांची सूची असलेल्या ‘जस्ट डायल’च्या सेवा दर सेकंदाला लक्षावधी ग्राहकांकडून विविध माध्यमांतून वापर होत असतो. अशावेळी परिपूर्ण सेवा देऊन ग्राहक समाधान देण्यासाठी संगणकीय पायाभूत सुविधा सामथ्र्यवान बनविणे हे आव्हानात्मक काम आयबीएमच्या भागीदारीतून सहजसाध्य झाले असल्याचे या मुंबईस्थित कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संदीपान चट्टोपाध्याय यांनी स्पष्ट केले. सेवेत तत्परता आणण्याबरोबरच ‘आयबीएम ब्लेड सेंटर सव्‍‌र्हर्स’मार्फत एकंदर परिचालन व देखभालीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.