‘नासकॉम’ अधिवेशनात तज्ज्ञांचा सूर; संक्रमणातील बेरोजगारीबद्दल चिंता व्यक्त

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचा प्रवास गेल्या दोन वर्षांमध्ये डिजिटलच्या दिशेने सुरू झाला असून या स्पर्धात्मक वातावरणात डिजिटल गोष्टींशी झटपट जुळवून घेणारे, त्यासंदर्भात नवे प्रयोग करण्याची क्षमता राखणारे कर्मचारी आणि कंपन्याच या नव्या डिजिटल त्सुनामीमध्ये टिकतील व पुढे जातील, अशाच आशयाचे मत दोन दिवसांमध्ये नासकॉम अधिवेशनात झालेल्या चर्चामध्ये अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेत नोकऱ्या गमावलेल्यांची संख्याही अधिक असल्याने डिजिटल त्सुनामीचा धसकाच कंपन्यांनी घेतल्याचे मळभ या चर्चामधून जाणवले.

एकाच वेळेस देशभरात आणि जगभरात असलेले राजकीय अस्थिर वातावरण, त्याचा अर्थकारणावर झालेला परिणाम, ब्रेग्झिट आणि अमेरिकेत सुरू झालेली ट्रम्प राजवट या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन वर्षांमध्ये आलेली डिजिटल त्सुनामीची लाट या सर्वच गोष्टी एकत्र आल्याने नासकॉमनेही यंदा त्यांचा या क्षेत्रासाठीचा पुढील आर्थिक वर्षांसाठीचा अंदाज अधिवेशनाच्या मंचावर व्यक्त करणे टाळल्याची चर्चा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारींमध्ये होती. या पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर झालेल्या दोन चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये डिजिटल परिवर्तनावर गंभीर चर्चा झाली.

डीबीएसचे नील क्रॉस, टाटा कम्युनिकेशन्सच्या ज्युली वुडस्, डिलोइटच्या बार्बरा वेन्न्ोमन, एचएसबीसीचे गणेश बालसुब्रमण्यम आणि जेनपॅक्टचे एन.व्ही. त्यागराजन या सर्वांनीच डिजिटल परिवर्तनाने आयटी कंपन्यांसमोर मोठे आव्हान केले असून त्याचा परिणाम सध्या पाहायला मिळतो आहे हे मान्य केले.

त्यागराजन म्हणाले की, अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात असे लक्षात आले आहे की, डिजिटल परिवर्तनामध्ये आलेल्या अपयशामागे डिजिटल गोष्टींशी झटपट जुळवून घेणे व प्रयोगशील होता न येणे ही दोन महत्त्वाची कारणे आहेत. याशिवाय डिजिटल कौशल्य नसणे हेही महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे अनेकांवर रोजगार गमावण्याचीही वेळ आली आहे.

डिजिटल आव्हानावर या क्षेत्रातील कंपन्यांना यशस्वीरित्या मात करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांना डिजिटल कौशल्यांसाठी वेगात प्रशिक्षत करणे हा महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यासाठी त्यांना एक वेगवान मोहीम हाती घ्यावी लागेल, असे सिस्कोचे अध्यक्ष दिनेश मलकानी यांनी सांगितले.

ते म्हणाले, आता डिजिटल युगात एकच एक कंपनी यशस्वी होण्यापेक्षा विविध दोन सामथ्र्य असलेल्या दोन कंपन्यांनी एकत्र येण्यातून दोघांचेही भविष्य अधिक सुरक्षित होणार असून अशा प्रयत्नांमधून डिजिटल माध्यमांमध्ये यश मिळण्याची खात्री अधिक असेल. किंबहुना म्हणूनच फिलिप्स या नामवंत कंपनीशी सिस्कोने सहकार्याचा हात पुढे केला आणि नवीन बाजारपेठ विकसित केली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

नोटाबंदीत बीटकॉइन्स व्यवहारात ३०० टक्के वाढ

डिजिटल युगामध्ये डिजिटल चलन महत्त्वाचे ठरेल, असे सांगून अलेक्स टॉपस्कॉट म्हणाले की, ब्लॉकचेन ही नवी क्रांती असेल. भारतामध्ये अलीकडेच निश्चलीकरणाचा प्रक्रिया झाली. यावेळेस बीटकॉइन्सच्या व्यवहारामध्ये तब्बल ३०० टक्के वाढ झाली. येणाऱ्या कालावधीत सरकारी नियमन कमी असलेल्या अर्थविषयक यंत्रणा ही एकूणच उद्य्ोग आणि समाज दोघांचीही गरज असणार आहे. त्यामुळे अशा यंत्रणांना येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील. मात्र या यंत्रणांच्या सर्व क्षमतांविषयी पूर्णपणे खात्रीशीर असे कोणतेही विधान करणे थोडे धाडसाचे ठरेल. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित धोकेही लक्षात ठेवणे गरेजेचे आहे, असे टॉपस्कॉट यांनी सांगितले.