23 September 2020

News Flash

इट्झ कॅश कार्डद्वारे उलाढालीची मात्रा

देशातील पहिल्या पेमेंट बँकेच्या कार्यान्वयनाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने अनिश्चितता व्यक्त केली असली, तरी पेमेंट व सेटलमेंट कायद्याअंतर्गत मध्यवर्ती बँकेची परवानगी मिळविणारी

| February 14, 2014 01:40 am

देशातील पहिल्या पेमेंट बँकेच्या कार्यान्वयनाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने अनिश्चितता व्यक्त केली असली, तरी पेमेंट व सेटलमेंट कायद्याअंतर्गत मध्यवर्ती बँकेची परवानगी मिळविणारी पहिली बिगर-बँकिंग कंपनी इट्झ कॅश लिमिटेडने मात्र आगामी काळात पेमेंट कार्ड व्यवसायाबाबत उत्साही संकेत दिले आहेत. कंपनीकडून वितरित प्रीपेड कार्ड वापरणाऱ्या १० दशलक्षाहून अधिक ग्राहकांचा एकूण वार्षिक विनिमय जो सध्याच्या तुलनेत वर्षभरात ३० टक्क्य़ांनी वाढून ७००० कोटींवर जाण्याचा अंदाज तिने वर्तविला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे इट्झ कॅशच्या वापरकर्त्यांमध्ये कॉर्पोरेट ग्राहकांबरोबरीनेच, घरापासून दूर मोलमजुरीसाठी आलेले विस्थापित कामगार, शेतमजूर, अल्पवेतनी श्रमिक आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी या ग्राहकांचा ६५% वाटा आहे, असे इट्झ कॅशचे उपाध्यक्ष व विपणनप्रमुख मुदित भटनागर यांनी सांगितले. कायमस्वरूपी निवासाचा पत्ता आणि वैध पुरावा नसल्याने बँकेत खाते उघडणे दुरापास्त असलेल्या अनेकानेक मंडळींसाठी इट्झ कॅश कार्ड हे बँकेतील खात्याविना उपलब्ध सोयीस्कर डेबीट कार्डच बनले असल्याचे भटनागर यांनी सांगितले. सध्या इट्झ कॅश पेमेंट गेटवेद्वारे प्रतिदिन दीड लाखांहून अधिक उलाढाली होतात. ज्या एका राष्ट्रीयीकृत बँकेची बरोबरी करणाऱ्याच असल्याचा दावा भटनागर यांनी केला. इतक्या मोठय़ा उलाढाली व रोखीच्या व्यवस्थापनाचे काम इट्झ कॅशच्या मुंबईतील मुख्यालयाद्वारे केले जाते.
सध्या इट्झ कॅश हे मास्टर आणि व्हिसाद्वारे संचालित प्रीपेड व पेमेंट कार्ड म्हणून वापरात येत असून, कॉर्पोरेट गिफ्ट कार्ड्ससाठी तो एक उमदा पर्याय ठरला आहे, असे भटनागर यांनी सांगितले. या कार्डाचा वापर देशभरातील पावणे-तीन लाख किरकोळ विक्रेत्यांकडे खरेदी विनिमयासाठी करण्याबरोबरीनेच, प्रवासासाठी तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण, मोबाईल रिचार्ज, हॉटेल बुकिंग, विविध देयकांचा भरणा करण्यासाठी तसेच विम्याचे हप्ते भरण्यासाठीही सहजपणे केला जातो. शिवाय कार्डधारक नसलेल्या ग्राहकांसाठी देशभरात ५०,००० हून अधिक इट्झ कॅश फ्रँचाईझी केंद्रे चालविण्यात येत असून, तेथे वरील सर्व सुविधा प्रदान केल्या जातात. सध्या या दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील ५० हजारांपैकी ७० टक्के केंद्रे ही महिलांद्वारे चालविली जात असल्याचे भटनागर यांनी स्पष्ट केले. आगामी नियोजन स्पष्ट करताना, फ्रँचाईझी केंद्रांच्या संख्येत वर्षभरात १५ हजारांनी भर घालण्याबरोबरच, एकूण व्यवसायात त्यांचा वाटा ५० टक्क्य़ांवर नेला जाईल असे भटनागर यांनी सांगितले.
ल्ल आर्थिक सर्वसमावेशकतेत बँकांना पूरकता
प्रीपेड कार्ड हे अनेक वंचित आणि निम्न आर्थिक स्तरातील मंडळींच्या आर्थिक सर्वसमावेशकतेच्या सरकारच्या उद्दिष्टांना पूरकच ठरत असल्याचे भटनागर यांनी सांगितले. सरकारच्या थेट लाभार्थ्यांना रोख हस्तांतरणाची योजना असो, अथवा सरकारी विभागांकडून नागरिकांना निधीचे हस्तांतरण असो बँकेच्या तुलनेत हे काम इट्झ कॅश कार्डद्वारे अधिक प्रभावीपणे पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:40 am

Web Title: itz cash card transaction
Next Stories
1 कर्मचाऱ्याच्या अज्ञानाची झळ ग्राहकाला नको म्हणून..!
2 सेन्सेक्स चार महिन्याच्या तळात तर निफ्टी सहा हजारावर
3 औद्योगिक उत्पादन दरात घसरणीची हॅट्ट्रिक
Just Now!
X