News Flash

‘जेट एअरवेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांचा राजीनामा

मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अमित अग्रवाल यांच्यापाठोपाठ दुबे यांनी देखील राजीनामा दिला आहे. 

‘जेट एअरवेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांचा राजीनामा
संग्रहित छायाचित्र

आर्थिक संकटात सापडलेल्या ‘जेट एअरवेज’मध्ये राजीनामा सत्र सुरुच असून मंगळवारी दुपारी ‘जेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय दुबे यांनी पदाचा राजीनामा दिला. मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अमित अग्रवाल यांच्यापाठोपाठ दुबे यांनी देखील राजीनामा दिला आहे.

हवाई सेवा क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी राहिलेल्या जेट एअरवेजवर सध्या स्टेट बँकेचे वर्चस्व आहे. कंपनीकडे स्टेट बँकेसह विविध १८ व्यापारी बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ही सेवा सुरू राखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे आंशिक वेतन देण्यासाठी आवश्यक निधी बँकेने नाकारल्याने दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ तिची विमाने जमिनीला खिळली आहेत.या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी जेट एअरवेजचे सह-मुख्य कार्यकारी आणि मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांनी राजीनामा दिला होता. यापाठोपाठ दुपारी कंपनीचे सीईओ विनय दुबे यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्यांनी देखील वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 5:28 pm

Web Title: jet airways ceo vinay dube resigns after cfos puts papers
Next Stories
1 ‘जेट एअरवेज’चे मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांचा राजीनामा
2 नवीन म्युच्युअल फंड वितरक नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर
3 जेट एअरवेजमागे संकटांचा ससेमिरा कायम
Just Now!
X