बँकांच्या थकीत कर्जापोटी गेल्या दीड वर्षांपासून जमिनीवर असलेल्या जेट एअरवेजच्या नव्याने उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जेट एअरवेजच्या खरेदीची बोली संयुक्त अरब अमिरातस्थित गुंतवणूकदार व लंडनच्या गुंतवणूक कंपनीने जिंकली आहे.

जेटसाठी यशस्वी दावेदार ठरलेल्या व्यावसायिक मुरारी लाल जालान व कालरेक कॅपिटलने जेटची उड्डाणे एप्रिल २०२१ पासून सुरू होऊ शकतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.

याबाबतच्या उभयतांच्या प्रस्तावाला अद्याप राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधीकरण तसेच प्रमुख नागरी हवाई महा संचालनालय व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

विविध व्यापारी बँकांचे कोटय़वधींचे कर्ज थकविल्यानंतर कंपनीविरुद्ध न्यायाधीकरणामार्फत कारवाई सुरू झाली होती. त्यानंतर कंपनीसाठी बोलीप्रक्रिया निश्चित करण्यात आली.