मुंबई : जेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड (कंपनी) या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासकांना एकात्मिक वित्तीय सेवा देणाऱ्या जेएम फिनान्शिअल समूहाच्या एनबीएफसी कंपनीने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या २,५०० दशलक्ष रुपयांच्या बेस इश्यू व १०,००० दशलक्ष रुपयांपर्यंत नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

याद्वारे एकूण १२,५०० दशलक्ष रुपयांच्या व २,००० कोटी रुपयांच्या शेल्फ लिमिटच्या आतील (ट्रॅंच कक इश्यू) सिक्युअर्ड, रेटेड, नोंदणीकृत, रीडीमेबल, अपरिवर्तनीय रोख्यांच्या (सिक्युअर्ड एनसीडी) खुल्या विक्रीला २० नोव्हेंबरपासून सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे. ट्रॅंच १ मध्ये कंपनीने जून २०१८ मध्ये ७,५०० दशलक्ष रुपये उभारले.

हा इश्यू २० डिसेंबर रोजी बंद होणार असून, कंपनीचे संचालक मंडळ (बोर्ड) किंवा एनसीडी पब्लिक इश्यू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार इश्यू लवकर बंद करण्याचा किंवा त्यास वाढीव मुदत देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

आयसीआरए व इंडिया रेटिंग्ज यांनी दिलेल्या नामांकनामधून आर्थिक जबाबदारी वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत ‘अत्यंत सुरक्षितता’ सूचित सिक्युअर्ड एनसीडींना आयसीआरएकडून २०,००० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आयसीआरएकडून २७ एप्रिलच्या पत्राद्वारे [आयसीआरए] एए/स्टेबल असे मानांकन देण्यात आले व नंतर १ नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे ते पुन्हा अधोरेखित करण्यात आले आणि २०,००० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी इंडिया रेटिंग्जकडून २७ एप्रिल रोजीच्या पत्राद्वारे आयएनडी एए/स्टेबल असे मानांकन देण्यात आले व नंतर १ नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे ते पुन्हा अधोरेखित करण्यात आले. आयसीआरए व इंडिया रेटिंग्ज यांनी सिक्युअर्ड एनसीडींना दिलेले मानांकन आर्थिक आश्वासने व जबाबदारी वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत अत्यंत सुरक्षितता दर्शवते, असे मानले जाते.

जेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाश्वत बेलापूरकर यांनी सांगितले की, जेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड ही स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गैर बँकिंग वित्त कंपनी असून तिने गेल्या काही वर्षांत मालमत्तेच्या उत्तम गुणवत्तेसह स्थिर वित्तीय कामगिरी केली आहे. आमचा सक्षम ग्राहकवर्ग याद्वारे आगामी काळातही आमची वाटचाल अशीच सुरू राहील. या वर्षी आमच्या पहिल्या इश्यूला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आम्ही पात्र गुंतवणूकदारांना ५ वर्षे व १० वर्षे कालावधीसाठी वार्षिक अतिरिक्त ०.१५% व्याजदर जाहीर केला आहे.

गुंतवणूक संधी

योजनेवर १०.२५% पर्यंत वार्षिक व्याजदर

उत्पन्न किमान किंवा १०% हून अधिक

आयसीआरएकडून [आयसीआरए] एए/स्टेबल

इंडिया रेटिंग्सकडून आयएनडी एए/स्टेबल