मुंबई : जेएम फायनान्शियल समूहाची बँकेतर वित्तीय कंपनी असलेल्या जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स लिमिटेडने प्रत्येकी १,००० रु. दर्शनी मूल्याचे सुरक्षित अपरिवर्तनीय रोखे अर्थात एनसीडीच्या सार्वजनिक विक्री  शुक्रवारी जाहीर केली. प्रति वर्ष ८.३० टक्के व्याज लाभ देऊ केलेल्या या रोख्यांच्या वेगवेगळ्या चार मालिकांचे पर्याय गुंतवणूकदारांसाठी खुले केले गेले आहेत. २३ सप्टेंबरपासून खुली होत असलेली ही भागविक्री भरणा पूर्ण होईपर्यंत अथवा १४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. इक्रा आणि क्रिसिल या दोन्ही संस्थांनी ‘एए / स्टेबल’ असे मानांकन बहाल केलेल्या रोख्यांसाठी किमान १०,००० रुपये किमान अर्ज रक्कम ठरविण्यात आली आहे.