ब्रिटनमधील ‘पील पोर्टस’ने जवाहरलाल नहेरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सोबत करार केला आहे. याअंतर्गत उभय बंदरांतर्गत भागीदारी व्यवहार होणार आहेत.
केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत याबाबतच्या करारावर ‘पील पोर्टस’चे मुख्य कार्यकारी मार्क व्हिटवर्थ आणि जेएनपीटीचे अध्यक्ष नीरज बंसल यांनी स्वाक्षरी केली.

गेल्या वर्षी ब्रिटनमार्फत भारतात ३२ कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. यात भारतातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी १० टक्का हिस्सा आहे. भारतीय कंपन्याही ब्रिटनमधील सर्वात मोठय़ा भागीदारांपकी एक असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
या करारांतर्गत जेएनपीटी आणि पील पोर्टस यांच्या दरम्यान बंदर व्यवस्थापन तसेच बंदर वाहतूक व व्यापारासाठी सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले.
मार्क व्हिटवर्थ यावेळी म्हणाले की, ब्रिटन व भारत हे दोन्ही देश नसíगक भागीदार राहिले आहेत. पुरवठा साखळी वितरण व संपर्क यासारखी समान आव्हाने या दोन्ही देशांसमोर आहेत, असेही ते म्हणाले.