संपूर्ण देशस्तरावर विशेषत: शासकीय कार्यालयांमध्ये मोफत वायफाय सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नरत जॉयस्टर इन्फोमीडियाने आता ही सुविधा ठाणे पोलीस आयुक्तालयात सुरू केल्याची घोषणा केली. अशा तऱ्हेने मोफत वायफाय सुविधा असलेले हे देशातील पहिले पोलीस आयुक्तालय असेल, ज्याचा पोलीस कर्मचाऱ्यांसह, शहरातील ६००० हून अधिक पोलीस मित्र तसेच जनसामान्यांनाही लाभ होईल. जॉयस्टरने मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसहित आजवर ५०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट स्थापित करून मोफत सुविधा प्रदान केली आहे. मुंबईतील नायर, केईएम पालिका रुग्णालये, एशियन हार्ट रुग्णालय, मीरा-भाईंदर महानगरपालिका या ठिकाणीही कंपनीने अशा सुविधा यापूर्वीच प्रदान केल्या आहेत.