सर्वाधिक मासिक, तिमाही, वार्षिक उत्पादन

मुंबई : जेएसडब्ल्यू स्टील या १२ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल असलेल्या जेएसडब्ल्यू समूहाच्या व्यवसाय विभागाने कच्च्या पोलाद निर्मितीबाबत विक्रमाची नोंद केली आहे. सर्वाधिक मासिक, तिमाही तसेच वार्षिक उत्पादनाबाबत कंपनीने अव्वल स्थान राखले आहे.

जेएसडब्ल्यू समूहाचे अस्तित्व पोलाद, उर्जा, पायाभूत सोयीसुविधा, सिमेंट, व्हेंचर्स आणि खेळ या क्षेत्रात आहे.

जेएसडब्ल्यू स्टील ही भारतातील सर्वात आघाडीची एकात्मिक अशी स्टील कंपनी असून कंपनीने १८ एमटीपीए क्षमतेचा पोलाद उत्पादन प्रकल्प तयार केला आहे.

जेएसडब्ल्यूचा पोलाद प्रकल्प हा कर्नाटकातील विजयानगर येथे आहे. १२ एमटीपीए क्षमतेचा सर्वाधिक पोलाद निर्मिती करणारा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडने कच्च्या पोलादाच्या बाबतीत सर्वाधिक उत्पादन नोंदविले आहे. मार्च २०१८ मध्ये १.५२ दशलक्ष टन उत्पादनाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्कय़ांची वाढ आहे.

२०१७—१८ च्या चौथ्या तिमाहीत ४.३ दशलक्ष टन उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्कय़ां नी वाढले आहे.

आर्थिक वर्ष २०१७—१८ मध्ये १६.२७ दशलक्ष टन उत्पादन झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३ टक्कय़ांची वाढ झाली आहे.

मार्च महिन्यात १.५२ दशलक्ष टन कच्च्या पोलादाचे उत्पादन घेण्यात आले असून १०१ टक्के क्षमतेचा वापर करण्यात आल्याचे नोंदवण्यात आले आहे.

कंपनीने १६.५ दशलक्ष टन उत्पादन घेत व्यवस्थापनाच्या अचूक मार्गदर्शनाखाली ९९ टक्के उत्पादनाचे ध्येय साध्य केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०१७—१८ ची दमदार सुरुवात केली होती, असा दावाही करण्यात आला आहे.

कंपनीने आगामी कालावधीत अधिक विस्तार योजना आखल्या असल्याची माहितीही देण्यात आली.