News Flash

रिलायन्सकडून ‘जस्ट डायल’!

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन राजदूत राहिलेल्या जस्ट डायलवर ३.०४ कोटींच्या माहितीचा साठा असून तिचे मार्च २०२१ च्या तिमाहीला १२.९१ कोटी ग्राहक नोंदले गेले आहेत.

रिटेल कंपनीद्वारे ६६.९५ टक्के हिस्सा काबीज

मुंबई : जिओ नाममुद्रेद्वारे किरकोळ विक्री क्षेत्रात स्थान भक्कम करणाऱ्या रिलायन्स समूहाने दूरध्वनी क्रमांकाद्वारे लघुउद्योग, आस्थापनांबाबतची माहिती पुरवली जाणाऱ्या मंचाची खरेदी केली आहे. रिलायन्स रिटेलने जस्ट डायलचा ६६.९५ टक्के हिस्सा ३,४९७ कोटी रुपयांमध्ये मिळवला आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन राजदूत राहिलेल्या जस्ट डायलवर ३.०४ कोटींच्या माहितीचा साठा असून तिचे मार्च २०२१ च्या तिमाहीला १२.९१ कोटी ग्राहक नोंदले गेले आहेत. जस्ट डायल २५ वर्षांपूर्वी सुरू झाले. जस्ट डायलचे व्ही. एस. एस. मणी यांच्याकडील १.३१ कोटी समभाग खरेदी करत १५.६२ टक्के हिस्सा प्रति समभाग १,०२० रुपये दराने खरेदी केला आहे. तर समभाग हस्तांतरणाच्या माध्यमातून जस्ट डायलच्या संचालक मंडळाने २,१६४.८० कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिली आहे. जस्ट डायलमध्ये ४०.९५ टक्के हिस्सा १६ जुलैच्या करारान्वये तर २६ टक्के हिस्सा खुल्या भागविक्रीद्वारे मिळवण्याचा रिलायन्स रिटेलचा पुढील कालावधीत प्रयत्न असेल. नव्या मालकीनंतरही मणी हेच जस्ट डायलचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:46 am

Web Title: just dial reliance ecommerce retail ssh 93
Next Stories
1 ‘बाजाराच्या चढय़ा मूल्यांकनांत ‘फ्लेक्झी कॅप’ सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय’
2 सेन्सेक्स, निफ्टी सप्ताहअखेर स्थिर
3 सेन्सेक्स, निफ्टीचे नवीन शिखर
Just Now!
X