News Flash

सीआयआय महाराष्ट्र राज्य परिषदेवर करपे, मलहोत्रा

भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी निनाद करपे तर उपाध्यक्षपदी अश्विनी मलहोत्रा यांची निवड झाली आहे. २०१३-१४ या नव्या आर्थिक वर्षांसाठी ही निवड

| March 14, 2013 03:38 am

भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी निनाद करपे तर उपाध्यक्षपदी अश्विनी मलहोत्रा यांची निवड झाली आहे. २०१३-१४ या नव्या आर्थिक वर्षांसाठी ही निवड आहे. करपे हे अ‍ॅपटेक या शिक्षणविषयक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर उपाध्यक्षपदी निवड झालेले अश्विनी मलहोत्रा हे वेकफिल्ड फूड्स या प्रसिद्ध खाद्यपदार्थ निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारतासह विविध ४० देशांमध्ये शैक्षणिक तांत्रिक सेवा पुरवठा असलेल्या अ‍ॅपटेकमध्ये करपे हे २००९ पासून महत्त्वाच्या जबाबदारीवर कार्यरत आहेत. कम्प्युटर असोसिएट्स या देशातील चौथ्या मोठय़ा सॉफ्टवेअर कंपनीच्या भारतीय व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालकपदही त्यांनी भूषविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:38 am

Web Title: karpe and ashwini malhotra is on council of cii maharashtra
Next Stories
1 सेन्सेक्स दौडीत २०० अंशांचा गतिरोधक
2 नवे बँकिंग परवाने
3 कर-कुचराईवर दंडात्मक कारवाई
Just Now!
X