31 May 2020

News Flash

किर्लोस्कर ब्रदर्स आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कृत

जागतिक पातळीवरील अग्रगण्य द्रव व्यवस्थापन कंपनी असलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडला (केबीएल) त्यांच्या कोईंबतूर येथील प्रकल्पाकरिता

| March 7, 2014 04:29 am

जागतिक पातळीवरील अग्रगण्य द्रव व्यवस्थापन कंपनी असलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडला (केबीएल) त्यांच्या कोईंबतूर येथील प्रकल्पाकरिता मॉरीशसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आफ्रिका-इंडिया लीडरशिप अवॉर्डमध्ये ‘बेस्ट ऑर्गनायझेशन फॉर विमेन टॅलेण्ट डेव्हलपमेण्ट’ या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. या पुरस्कारांचे आयोजन आफ्रिका-इंडिया पार्टनरशिप समिटद्वारा करण्यात आले होते. विविध खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी केलेल्या कामगिरीला आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना सन्मानित करणे हे पुरस्कारांचे उद्दिष्ट होते. या पुरस्कार सोहळ्याला सहभागी देशांतील राजकारणी, धोरणकत्रे आणि नोकरशहा तसेच विविध उद्योगांतील जेष्ठ व्यावसायिक उपस्थित होते.
निर्माण प्रक्रियांमध्ये १०० टक्के स्त्री सहाय्यकांचा समावेश केला गेलेली केबीएल ही भारतातील एकमेव कंपनी आहे. केबीएलने २०११ मध्ये स्थापन केलेल्या या ऑल-विमेन प्रकल्पाच्या प्रयत्नांना ओळख मिळवून देण्याकरिता हा विमेन लीडरशिप पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प अत्याधुनिक सामुग्रीने सुसज्ज असून तो डॉमेस्टीक पंप्सच्या वेगवेगळ्या मॉडेल्सचे निर्माण करतो. या प्रकल्पामधील शॉप फ्लोअरमध्ये १९ ते ३० वष्रे वयोगटातील ६२ स्त्रिया आहेत. या प्रकल्पामध्ये भरती केल्या गेलेल्या स्त्रियांना दोन महिन्यांचे औद्योगिक प्रशिक्षण देण्यात आले होते.
केबीएलच्या कोईंबतूर प्रकल्पाचे विभागीय मुख्य डॉ. आर. व्ही. राज कुमार म्हणाले, ‘विमेन लीडरशिप’ पुरस्कारामुळे स्त्री कामगारांच्या कोणत्याही कामाला अतिशय कुशलतेने मार्गी लावण्याच्या क्षमतेला आणि त्यांच्या नपुण्याला ओळख मिळाली आहे. अशा पुढाकारांमुळे स्त्रियांना पुढे येऊन नेतृत्व करण्यास प्रोत्साहन मिळते आणि कॉर्पोरेट तसेच अंगमेहनतीच्या क्षेत्रात तोडीस तोड कामगिरी करण्यास प्रेरणा मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2014 4:29 am

Web Title: kirloskar brothers rewarded in international conference
Next Stories
1 मुथूट फायनान्सतर्फे स्मार्ट एटीएम दाखल
2 ‘युनायटेड बँके’ची पत ‘आरबीआय ’च्या हाती
3 ऐतिहासिक टप्प्यानजीक सेन्सेक्स
Just Now!
X