मुंबई: प्रवर्तकांकडून हिस्सा विक्रीसह लाभांश नाकारला जाण्याच्या गुंतवणूकदारांमधील वदंतेने केपीआयटी टेक्नॉलॉजीजच्या समभागाला गुरुवारी शेअर बाजारात ९.५० टक्क्य़ांपर्यंत घसरणीचा फटका बसला. दरम्यान कंपनीने मात्र या साऱ्या अफवांचा इन्कार मुंबई शेअर बाजाराला लेखी कळविला. कंपनीतील विदेशी व स्थानिक गुंतवणूकदारांच्या प्रमाणात तूर्त कोणताही बदल करण्यात झालेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
मात्र दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात हा समभाग ९.०८ टक्क्य़ांनी घसरून ९०.१५ रुपयांवर आला. तर कंपनीतील प्रवर्तकच हिस्सा विकत असल्याच्या समाज माध्यमांमधील चर्चेनंतर मुंबई शेअर बाजारानेही केपीआयटीकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर कंपनीने तसे काही नसल्याचा खुलासा केला.
कंपनीत ५४.१५ टक्के हिस्सा हा विदेशी गुंतवणूकदारांचा आहे, तर येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ५५ टक्के लाभांश देण्याची कंपनीची तयारी आहे. दरम्यान, अफवांच्या फेऱ्यात समभागाने मात्र गेल्या तीन वर्षांतील नीचांक मूल्य गाठले आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
serious allegations against boeing
अन्वयार्थ : बडयांवर बडग्याची बाजारकेंद्री ‘संस्कृती’