News Flash

कर्तव्यनिष्ठ अधिकारी! वडिलांच्या निधनानंतरही ‘बजेट’ला पहिलं प्राधान्य

डेप्युटी मॅनेजर पदावर काम करणाऱ्या कुलदीप कुमार शर्मा यांनी ड्युटी फर्स्ट म्हणजे काय ते आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या कर्तव्यनिष्ठेविषयी चर्चा सुरु असताना, काही जणांच्या तोंडून ड्युटी फर्स्ट हे शब्द बाहेर पडतात. ड्युटी फर्स्ट म्हणजे अन्य संसारीक जबाबदाऱ्यांऐवजी नोकरीच्या ठिकाणी कामाला पहिले प्राधान्य. अर्थ मंत्रालयात डेप्युटी मॅनेजर पदावर काम करणाऱ्या कुलदीप कुमार शर्मा यांनी ड्युटी फर्स्ट म्हणजे काय ते आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. कुलदीप कुमार शर्मा यांच्याकडे बजेट संदर्भातील महत्वाची जबाबदारी होती. बजेटच्या कामामध्ये गुंतलेल्या सर्वांनाच गोपनीयता बाळगावी लागते. बजेटचे कामकाज सुरु असताना, कुलदीप कुमार शर्मा यांच्या वडिलांचे निधन झाले. पण या दु:खद प्रसंगात त्यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी मागे सोडून कर्तव्याला पहिले प्राधान्य दिले.

कुलदीप कुमार शर्मा २२ जानेवारीपासून बजेट प्रिंटिंगच्या कामामध्ये व्यस्त आहेत. २६ जानेवारी रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी जाणे अपेक्षित होते. पण कुलदीप कामावरच राहिले. ते अजूनही नॉर्थ ब्लॉकमध्ये बजेट छपाईच्या कामामध्ये व्यस्त आहेत. अर्थमंत्रालयाने कुलदीप कुमार शर्मा यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

२२ जानेवारीला हलवा सेरेमनी नंतर नॉर्थ ब्लॉकमध्ये बजेटच्या प्रिंटिंगचे काम सुरु झाले. एक फेब्रुवारीलाच ही टीम बाहेर पडेल. सलग दहा दिवस बजेट प्रिंटिंगचे काम चालते. बजेटची गोपनीयता कायम रहावी यासाठी कोणीही बाहेर येऊ शकत नाही. जवळच्या नातेवाईकाचे अचानक निधन झाले तर तुम्ही बाहेर येऊ शकता. पण कुलदीप शर्मा यांनी आपल्या कामाला पहिले प्राधान्य दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 5:05 pm

Web Title: kuldeep sharma duty first budget 2020 father death dmp 82
टॅग : Budget 2020
Next Stories
1 Economic Survey : मोदी सरकारच्या स्वप्नांना धक्का? कसं गाठणार ‘5 ट्रिलियन डॉलर’चं लक्ष्य?
2 Economic Survey : ६ ते ६.५ टक्के दराने होईल देशाचा आर्थिक विकास
3 Budget 2020: जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक – रामनाथ कोविंद
Just Now!
X