मोबाईलद्वारे पेमेंटची सुविधा देणाऱ्या कंपन्यांना अखंड सुविधा पुरविण्याकरिता ग्राहकांकडून ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून घेणे अनिवार्य असल्याचे पेटीएमने रिझव्‍‌र्ह बँकेच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे.

पेटीएमची संपूर्ण केवायसी प्रक्रिया सुलभ, सुरक्षित आणि मोफत असल्याचेही कंपनीने याबाबत म्हटले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कागदरहित असून यात आधारच्या उपयोगाद्वारे बायोमेट्रिक तपशिलांची पुष्टी मिळते, असे सांगण्यात आले आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना पेटीएमद्वारे विशेष सवलत देण्यात येत असून पेटीएम खात्यात १ लाख रुपये साठविण्याची सुविधा, दुसऱ्या पेटीएम खात्यात १ लाख रुपयांपर्यंत शिल्लक हस्तांतरणाची सुविधा तसेच एखाद्याच्या बँक खात्यात दरमहा २५ हजार रुपयेपर्यंत हस्तांतरणाची सुविधा देऊ करण्यात आली असल्याचे पेटीएमने म्हटले आहे. मिनिटाहून कमी कालावधीत मोफत पेटीएम पेमेंट बँक खाते सुरू करण्यासह २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आहे.