News Flash

एल अ‍ॅण्ड टी फायनान्स रोखे विक्रीतून १,५०० कोटी उभारणार

हा निधी कंपनीकडून कर्ज वितरण क्षमतेत वाढीसाठी केला जाणार आहे.

मुंबई : बँकेतर वित्तीय कंपनी एल अ‍ॅण्ड टी फायनान्स लिमिटेडने सुरक्षित अपरिवर्तनीय रोख्यांच्या सार्वजनिक विक्रीतून १,५०० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. हा निधी कंपनीकडून कर्ज वितरण क्षमतेत वाढीसाठी केला जाणार आहे.

प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याच्या रोख्यांची विक्री १६ डिसेंबर ते ३० डिसेंबर यादरम्यान सुरू राहील आणि विक्रीपश्चात या रोख्यांची मुंबई तसेच राष्ट्रीय अशा दोन्ही भांडवली बाजारांत सूचिबद्धता केली जाणार आहे. ‘सेबी’ने ५०० कोटीपर्यंतच्या रोखे विक्रीला परवानगी दिली असून मागणी वाढल्यास कंपनी अतिरिक्त १,००० कोटी उभारू शकेल, असे  एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीनानाथ दुभाषी यांनी स्पष्ट केले.

एल अ‍ॅण्ड टी फायनान्स या ३६ महिने, ६० महिने आणि ८४ महिने अशा मुदतीच्या रोख्यांवर गुंतवणूकदारांना ८.२५ टक्के ते ८.६५ टक्के असे विविध दराने परतावा पर्याय देऊ केले आहेत. बिगर-बँकिंग वित्तीय सेवांमध्ये कार्यरत एल अँड टी फायनान्सच्या मुख्य व्यवसायात पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, सूक्ष्म वित्तपुरवठा आणि गुंतवणूक व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

क्रिसिल, केअर आणि इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थांनी या रोखे विक्रीला क्रिसिल ट्रिपल ए (स्टेबल), केअर एएए/स्टेबल आणि आयएनडी एएए/स्टेबल असा पतदर्जा बहाल केला आहे. एडेल्वाइज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस, एके कॅपिटल सव्‍‌र्हिसेस, ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्स आणि जेएम फायनान्शियल या कंपन्या या रोखे विक्रीचे व्यवस्थापन पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:18 am

Web Title: l t finance launches rs 1500 cr ncd issue zws 70
Next Stories
1 बँक ऑफ इंडिया, युनियन बँकेची व्याजदर कपात
2 बँक, ऊर्जा समभागांत विक्रीचा दबाव ; निर्देशांकांत अर्ध्या टक्क्यांनी घसरण
3 स्टेट बँकेच्या बुडीत कर्ज नोंदीत ११,९३२ कोटींची तफावत
Just Now!
X