पारंपरिक बाजाचे आणि घाटाचे मोत्यांच्या दागिन्यांकरिता ७५ वर्षांहून जास्त वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारी पेढी म्हणून लागू बंधूंचा लौकिक आहे, परंतु तेवढेच हिऱ्यांच्या, रत्नांच्या आणि सोन्याच्या कसबी कलाकुसरीच्या दागिन्यांसाठीही लागू बंधूंचे वैशिष्टय़पूर्ण ओळख राहिली आहे. वेगवेगळ्या डिझाइन्सचे प्रयोग आणि अस्सल मोती, कल्चर्ड मोती, सफायर, रुबी, पोवळं असे विविध प्रकारचे रत्न सुंदररीत्या गुंफलेले दागिने हेही या पेढीचे वैशिष्टय़ आहे. याच वैशिष्टय़ामुळे या पेढीचा विस्तार गोव्यापर्यंत आणि अगदी परदेशात अमेरिकेतही झाला आहे. हीच अद्वितीय दागिन्यांची श्रेणी घेऊन लागू बंधूने त्यांचे प्रदर्शन येत्या १७, १८ आणि १९ जानेवारी रोजी हॉटेल अ‍ॅबॉट, सेक्टर २, मेघराज मल्टिप्लेक्सजवळ, वाशी येथे सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. दागिने पाहण्याबरोबरच खरेदीचीही यानिमित्ताने नवी मुंबईवासीयांना संधी मिळेल.