25 November 2017

News Flash

लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटेडर @ फक्त पाच कोटी

स्पोर्टकार, वा अलिशान अशा राजेशाही मोटारी तयार करणाऱ्या लॅम्बोर्गिनी कंपनीने शुक्रवारी अ‍ॅव्हेंटेडर एलपी ७००-४

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 26, 2013 4:48 AM

स्पोर्टकार, वा अलिशान अशा राजेशाही मोटारी तयार करणाऱ्या लॅम्बोर्गिनी कंपनीने शुक्रवारी अ‍ॅव्हेंटेडर एलपी ७००-४ रोडस्टर ही स्पोर्टकार भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल केली आहे. मोटारीची एक्स-शोरूम किंमत ४ कोटी ७७ लाख ५५ हजार रुपये असून ओपन टॉप असणारी ही मोटार स्पोर्ट कारमधील मैलाचा दगड ठरली आहे.
या मालिकेतील सुमारे १३०० मोटारी जागतिक बाजारपेठेत आधीच दाखल झालेल्या आहेत. मोटारीचे छप्पर हे उघडझाप करण्याची सुविधा असून ऐटदार अशी रचना इंजिनपासून त्यात दिलेल्या रचनात्मक सौंदर्य असणाऱ्या रेषा आणि केवळ ३ सेकंदात ताशी १०० किलोमीटर इतका वेग गाठण्याची ताकद असणारे इंजिन व ताशी कमाल वेग ३५० किलोमीटर इतका पकडण्याची क्षमता असणारी ही अ‍ॅव्हेंटेडर एलपी ७००-४ रोडस्टरआरेखन, गुणवत्ता आणि वाहन चालनातील अप्रतिम आनंद यासाठी वाहनप्रेमींचे लक्ष्य ठरेल.
६.५ लीटरचे व्ही १२ इंजिन, आयएसआर ७ स्पीड गीअर असणारे गीअरबॉक्स आणि पुश रॉड सस्पेंशन, व्हील रिम हसक्या वजनाच्या मजबूत अ‍ॅल्युमिनियमचे असून अन्य मोटारींच्या तुलनेत ते दहा किलोने मोटारीचे वजन कमी करतात.मोटारीचे छप्पर दोन भागामध्ये असून आरटीएम व फोर्जड् तंत्राने बनविलेले कार्बन फायबरचे आहे. त्याचा प्रत्येक भाग सहा किलोपेक्षा कमी वजनाचा असून अंतर्गत सजावटीमध्ये दर्जेदार मानले जाणारे सब्बिया नेफर्टम हे चामडे रेखीवपणा, कलाकुसर आणि दर्जा याबरोबरच दणकट अशी ही अ‍ॅव्हेंटेडर एलपी ७००-४ रोडस्टर आहे.

First Published on January 26, 2013 4:48 am

Web Title: lamborghini unveils aventador roadster at rs 5 crore