03 August 2020

News Flash

रिलायन्समधील हिस्सा एलआयसीने वाढविला

सरकारसाठी बिकट प्रसंगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हात देणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सोमवारी आघाडीची खासगी कंपनी

| March 3, 2015 07:31 am

सरकारसाठी बिकट प्रसंगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हात देणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सोमवारी आघाडीची खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील आपला हिस्सा उंचावला. अब्जाधीश मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्समध्ये एलआयसीचा हिस्सा आता २.०९ टक्क्य़ांनी वाढला आहे. तो आता तब्बल ९.०८ टक्के झाला आहे. एलआयसीने ६.७८ कोटी समभाग भांडवली बाजारातून खुल्या पद्धतीने खरेदी केले. त्यामुळे रिलायन्समधील एलआयसीच्या हिश्श्याचे मूल्य आता २५,१५० कोटी रुपये झाले आहे. यापूर्वी तिचा रिलायन्समध्ये ६.९८ टक्के हिस्सा होता. नवी खरेदी ही २३ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान झाली असल्याचे रिलायन्सनेच मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 7:31 am

Web Title: lic hikes stake in reliance industries ltd to 9 08 per cent
Next Stories
1 टॅक्सी सेवा क्षेत्रातील स्पर्धक आले एकत्र
2 वाहन उद्योगाची आगेकूच कायम
3 श्रीराम ऑटोमॉलचा कॉर्पोरेशन बँकेसोबत करार
Just Now!
X