देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीने विमा बाजारपेठेतील सर्व घटकांना समाविष्ट करणारी न्यू जीवन आनंद योजना सादर केली आहे. ‘नॉन पार्टीसिपेटरी’ प्रकारची अर्थात मुदतपूर्तीनंतर निश्चित रक्कम देणारी आणि बाजार घटकांशी संबंध नसणारी योजना आहे.

विमाधारकास पूर्व निश्चित कालावधीनंतर एकत्रित रक्कम आणि कालावधीत विमा छत्र देणारी ही योजना आहे. विमाधारकाच्या रोकड सुलभतेची काळजी घेण्यासाठी विमा योजना तारण ठेऊन कर्ज घेण्यास ही योजना पात्र असेल.

या विमाधारकाचा विमा मुदती दरम्यान मृत्यू झाल्यास विमा रकमेच्या रुपात परिभाषित केलेली रकमे व्यतिरिक्त ‘रिव्हर्शनरी बोनस’ आणि अंतिम अतिरिक्त बोनस (संचित असल्यास) देय असेल, अशी माहिती एलआयसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

जिथे मृत्यूनंतर दाव्याची रक्कम निश्चित केली जाते त्या मूलभूत रकमेच्या १२५ किंवा वार्षिक विमा हप्त्याच्या जास्तीत जास्त १० पट परिभाषित केली आहे.

विमा योजना दरम्यान मृत्यू झाल्यास मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या सर्व हप्त्यांच्या १०० टक्क्य़ांपेक्षा असणार नाही. विमा योजना मुदतीनंतर महामंडळाच्या नफ्यातील हिश्याचा लाभ विमाधारकाला मिळेल.