10 August 2020

News Flash

व्यापक जीवन आणि आरोग्य विमा

विम्याचा उद्देश जीवनाच्या दुर्दैवी घटनांमुळे येणाऱ्या अनिश्चित वेळी आíथक स्थर्य पुरविणे हा आहे.

| May 13, 2015 06:27 am

विम्याचा उद्देश जीवनाच्या दुर्दैवी घटनांमुळे येणाऱ्या अनिश्चित वेळी आíथक स्थर्य पुरविणे हा आहे. आपण आरोग्य विम्याचे महत्व जाणून आहोत आणि म्हणून आपल्या अनुपस्थितीतही आमच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी पुरेशा रकमेचा आपल्या आरोग्य विम्यात अंतर्भाव करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. पण पुष्कळदा आपण आरोग्य विम्याचे महत्व ओळखण्यात अपयशी ठरतो. 

आरोग्याच्या तक्रारींमुळे दीर्घकाळ रूग्णालयात मुक्काम करायला लागल्यामुळे औषधांवरील वाढता खर्च होतो आणि त्याचा कुटुंबाच्या आíथक स्थितीवर परिणाम होतो. म्हणून, वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या वाढत्या खर्चासाठी आरोग्य विमा काढणे आवश्यक आहे.
यामुळे आपण औषधाच्या खर्चाच्या किंमतीचा विचार न करता बरे होण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो! एखाद्या व्यक्तीच्या रूग्णालयात दाखल होण्यासाठी झालेल्या खर्चाची नुकसानभरपाई आरोग्य विमा पुरवते.
भारतातीय बाजारपेठेत व्यापक जीवन आणि आरोग्य विमा उत्पादने जास्त उपलब्ध नसली तरी एकाच करारामध्ये जीवन त्याचबरोबर आरोग्य विमा संरक्षण पुरविणे अंतर्भूत करणाऱ्या व्यापक जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीचे लक्षणीय फायदे आहेत.
पॉलिसीधारकाच्या गंभीर गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादनामध्ये दिलेल्या फायद्यांमध्ये त्याच्या गरजा पूर्ण होतील, अशा विमा योजना निवडणे आवश्यक आहे. वाढत्या वयातील उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमुळे नाकारले जाणे आणि जादा हप्ता टाळण्यासाठी आरोग्य विमा तरुण वयातच काढला पाहिजे.
खरे तर एखाद्या व्यक्तीच्या ५० वर्षांनंतरच त्याचे आरोग्य खालावण्यास सुरुवात होते आणि म्हणून आरोग्य विमा हा त्याआधीच्या वयातच काढला जाणे महत्वाचे आहे.
लक्ष द्यावे अशा आरोग्य विमा उत्पादनांच्या इष्ट वैशिष्टय़ांची यादी पुढे आहे :
रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च जसे की, खोलीचे भाडे, नìसगचा खर्च, अतिदक्षता विभागासाठीचे शुल्क, डॉक्टरांचे शुल्क, अन्य उपचार शुल्क हे सर्व त्या उत्पादनात अंतर्भूत केले जाते.
अनेकदा खोली भाडय़ाासारख्या शुल्कावर जास्तीत जास्त क्षमता लागू केली जाते. पण, रुग्णालयाच्या प्रकारानुसार खोली भाडे बदलत असल्यामुळे ते एक जास्तीचे बंधन होऊ शकेल. खर्चाच्या प्रकारावर कोणतेही उप-मर्यादा लागू नसलेले उत्पादन निवडणे फार चांगले. तथापि, याचा प्रिमियम खूप जास्त असू शकतो.
वाढत्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेण्यासाठी जर ते उत्पादन नियमितपणे वाढणारे संरक्षण देऊ करत असेल तर ते उपयोगी पडेल. रकमेची निवड ही प्रिमियम परवडण्याचा विचार करून खात्री केलेली असावी.
विमा कंपन्यांचे रुग्णालयांचे जाळे चांगले असावे. जेथे रोकडविरहित रुग्णालयात दाखल होण्याची सुविधा उपलब्ध असू शकेल. एखाद्या आपात्कालीन वेळी रोकडविरहित रुग्णालयात दाखल होण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी विमा कंपनीकडे समíपत वृत्तीची हेल्पलाइन असावी. त्या उत्पादनात रूग्णालयात दाखल होण्याआधीचे आणि दाखल झाल्यानंतरचे खर्चही समाविष्ट केलेले असावेत. अनेकदा हा लाभ ३ ते ६ महिन्यांसाठी पुरविला जातो.
काही आरोग्य विमा योजना तीन वर्षांतून एकदा मोफत आरोग्य चेकअप देऊ करतात आणि आरोग्याची काळजी निवारक म्हणून मदत करतात. या नियमीत आरोग्य तपासणीमुळे आरोग्याच्या दिसून न येणाऱ्या किरकोळ दुखणी शोधून काढण्यात मोलाची मदत होऊ शकते.
काही उत्पादने वर्षभरात काही दावा न केल्यास पॉलिसीच्या संरक्षित रकमेमध्ये वाढ देऊ करतात. उदाहरणार्थ, पहिल्या पॉलिसी वर्षांत जर काही दावा केला नाही तर दुसऱ्या वर्षांतील संरक्षित रक्कम ७% पर्यंत वाढते किंवा दाव्यांची सूट मिळत नाही.

विमा हे असे एक उत्पादन आहे जे मनाला शांती बहाल करते आणि दुर्दैवी घटनांमध्ये आपल्या गरजा आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला सक्षम करते. एक योग्य विमा उत्पादन जे गरजेच्या वेळी उपलब्ध असेल अशा उत्पादनाची निवड करण्यासाठी थोडा वेळ आणि पसे बाजूला काढून ठेवणे अत्यावश्यक आहे. व्यापक जीवन आणि आरोग्य विमा दोन्ही मूलभूत गरजा एका पॉलिसीमध्ये पूर्ण करण्याची खात्री देतो आणि आíथक संरक्षणाची हमी देतो.

पॉलिसीमधील वगळण्यात येणाऱ्या मानकांचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि ती जाणून घेतली पाहिजे. अनेकदा पूर्व-विद्यमान आजार वगळले जातात आणि काही उत्पादने म्हणजे वगळण्यात येणाऱ्या मानकांची यादी असते.

लेखक कोटक लाइफ इन्शुअरन्सचे मुख्य संख्यातज्ज्ञ आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2015 6:27 am

Web Title: life and health insurance
Next Stories
1 ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत
2 विदेशी गुंतवणूकदारांना पुन्हा सुखद धक्का
3 व्याजदर कपातीच्या दिशेने तेजीचे वारे
Just Now!
X