|| रवींद्र शर्मा

आयुष्य केवळ स्वत:साठीच नाही, तर जवळच्या माणसांसाठी अधिक महत्त्वाचे असते – ही जाणीव झाली की ‘मी’कडून ‘आम्ही’च्या दिशेने विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. आयुर्विम्याने दिलेल्या हमीमुळे ‘मी’ ते ‘आम्ही’ हे परिवर्तन आनंददायी होते.

कुटुंबासाठी आर्थिक संरक्षणाच्या तरतुदीचा सर्वात सोपा व अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे शुद्ध विमा म्हणजे ‘प्रोटेक्शन प्लान’ घेणे. ‘मी’ ते ‘आम्ही’ असा बदल होत असताना, बालक, जोडीदार किंवा पालक तुमच्यावर व तुमच्या उत्पन्नावर अवलंबून राहू लागतात आणि यासाठीच तुम्ही आयुर्विमा घेणे अतिशय गरजेचे आहे; तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील कल्याणासाठी केलेल्या बांधिलकीचे ते एक प्रकारचे प्रतीक असते. प्रोटेक्शन प्लानमुळे मिळणाऱ्या आश्वासनामुळे ‘मी’कडून ‘आम्ही’ हा बदल आनंददायी ठरू शकतो.

पॉलिसी कालावधीमध्ये विमाधारकाचा (योजना खरेदी करणारी व हप्ते भरणारी व्यक्ती) अवेळी मृत्यू झाल्यास, विमा कंपनी नामनिर्देशित व्यक्ती अर्थात नॉमिनी किंवा सव्‍‌र्हायव्हर यांना विम्याची रक्कम देईल, याची काळजी प्रोटेक्शन प्लान किंवा पारंपरिक टर्म इन्शुरन्स योजना घेते. यामुळे कर्त्यां व्यक्तीच्या जाण्याने येणाऱ्या आर्थिक संकटावर त्यांना मात करण्यास मदत होऊ शकते.

कमीत कमी खर्चामध्ये मोठे कवच दिले जात असल्याने प्रत्येकाने जीवनात टर्म प्लान हे आर्थिक साधन खरेदी करणे अत्यावश्यक आहे. जीवनशैली कायम ठेवणे शक्य होण्याच्या दृष्टीने पुरेसे वित्तीय संरक्षण देण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे १० पट अधिक कवच घ्यावे, हा सर्वसाधारण नियम पाळावा.

पारंपरिक टर्म प्लानद्वारे सुरक्षेची तरतूद केल्यानंतर, गंभीर आजार झाल्यास त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी विचार करणे अत्यावश्यक आहे. आरोग्यसेवेच्या खर्चामुळे भारतातील अंदाजे ५५ दशलक्ष लोक दर वर्षी हलाखीत ढकलले जातात, असे पाहणीमध्ये आढळले आहे.

आधुनिक जीवनशैलीमुळे, भारतात होणारे ६१ टक्के मृत्यू कर्करोग, मधुमेह व हृदयाचे आजार अशा गैर-संक्रमणीय रोगांमुळे (एनसीडी) होतात. या आजारांचे स्वरूप विचारात घेता, व्यक्तीची काम करण्याची व कमावण्याची क्षमता बाधित होते. त्यामुळे महत्त्वाच्या आजारांशी संबंधित असलेल्या शारीरिक त्रासांव्यतिरिक्त, आर्थिक तयारी नसल्यास संपूर्ण कुटुंबाची भावनिक ओढाताण होते. ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ घेणे, हा आधुनिक जीवनशैलीच्या आव्हानांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वात किफायतशीर मार्ग आहे.

आजच्या काळात व दिवसांत, ‘मी’ ते ‘आम्ही’ हे परिवर्तन आनंददायी ठरण्यासाठी, सर्वागीण संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने पारंपरिक प्लान व क्रिटिकल इलनेस कव्हर, हे दोन्हीही घेणे गरजेचे आहे. आनंदाची बातमी म्हणजे, या दोहोंचा संकर असलेले ‘हायब्रीड प्रोटेक्शन प्लान’ उपलब्ध असून, त्यामध्ये पारंपरिक टर्म इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस हे एकाच योजनेमध्ये समाविष्ट केले जातात. जसजसे वय वाढेल, तसतशी बचत वाढत जाते व जबाबदाऱ्या कमी होत जातात, तर गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच, वयानुसार विमा कवचाची गरज कमी होते, तर क्रिटिकल इलनेसची गरज वाढत जाते.

सर्वसमावेशक कवचाबरोबरच, हे उत्पादन क्रिटिकल इलनेसचे निदान झाल्यास प्रीमियममध्ये सवलत देऊ करते. आयुष्याच्या अवघड टप्प्यामध्ये हप्ते भरण्याची चिंता नको, याची शाश्वती यामुळे दिली जाते. निदान झाल्यावर ‘सीआय सम अ‍ॅश्युअर्ड’ ही लागू असलेली एकसाथ मोठी रक्कम दिली जातेच, शिवाय भविष्यातील हप्ते न भरता विमा कवच कायम राहते.

(लेखक, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे संपर्क विभागाचे प्रमुख)