27 May 2020

News Flash

आयुर्विम्याची साथ जीवनातील स्वप्नपूर्तीसाठीही!

कुटुंबाच्या भविष्याकरिता आयुर्विमा योजनेमार्फत केली जाणारी दीर्घकालीन नियमित बचत यापेक्षा वेगळी नाही

कार्तिक रामन

आपल्यापैकी अनेकांना झाडे लावण्याचा छंद असेल. झाड मोठे होऊन त्यांना फळे लागेपर्यंत त्याचे पोषण व देखभालही आपण करतो. अनेक वर्षांच्या गुंतवणुकीचे ते फलित असते. कुटुंबाच्या भविष्याकरिता आयुर्विमा योजनेमार्फत केली जाणारी दीर्घकालीन नियमित बचत यापेक्षा वेगळी नाही. ज्याप्रमाणे मोठे बनलेले वृक्ष ऊन-पावसापासून बचाव करते, त्याचप्रमाणे आयुर्विमा तुमच्या पश्चात आर्थिक आपत्तीपासून कुटुंबाचे संरक्षण करते.

झाड मोठे होऊन त्याला फळे लागायची झाल्यास, त्याला नियमित पाणी देणे, त्याचे मोठय़ा कालावधीपर्यंत भरण-पोषण करावे लागते. अगदी तसेच आयुर्विमा योजनेत नियमित हप्त्यांचा भरणा कैक वर्षांपर्यंत करावा लागतो, जेणेकरून पॉलिसीच्या मुदतपूर्तीला निर्धारित आर्थिक उद्दिष्टे व स्वप्ने साकारली जाऊ शकतील.

आयुर्विमा गुंतवणुकीत सातत्य राखण्याचे फायदे

बाजारसंलग्न विम्याच्या योजना जसे, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान (युलिप) या दुहेरी फायदा देतात. सर्वप्रथम त्या आयुर्वम्यिाचे संरक्षण प्रदान करणारा फायदा देतात. ज्यामुळे तुमच्या पश्चात कुटुंबाला उदरनिर्वाहाचा खर्च चालविण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. या बरोबरीने या योजना महत्त्वाची आर्थिक उद्दिष्टे जसे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तरतुदीचीही काळजी घेतात.

युलिप पॉलिसीधारकांना त्यांच्या जोखीम सोसण्याच्या कुवतीनुसार, त्यांचा पसा गुंतविण्यासाठी पर्याय निवडीचेही स्वातंत्र्य देते. पॉलिसीधारक त्यांचा पसा कमी जोखीम असलेल्या डेट फंडात आणि उच्च जोखीम असलेल्या परंतु परताव्याची चांगली शक्यता असलेल्या इक्विटी फंडात त्यांना रुचेल अशी संतुलित विभागणी करूनही ठेवू शकतात. याचा अर्थ जे जोखीम टाळू इच्छितात त्यांचा डेट फंडाकडे कल असेल, त्याउलट ज्यांना उच्च परतावा हवा आहे ते जोखीम घेऊन इक्विटी फंडाला पसंती देऊ शकतील. इक्विटी अथवा समभागांमधील गुंतवणूक ही दीर्घ मुदतीत उच्च लाभ देतेच. त्यामुळे युलिपसारख्या आयुर्विमा योजनेत दीर्घ कालावधीसाठी १० वर्षे व अधिक काळ गुंतवणुकीत राहून तुम्ही अल्पावधीतील चढ-उतारांवर मात करून चांगल्या परताव्याच्या शक्यता निर्माण करीत असता. नियमित हप्ते भरत राहून, डेट आणि इक्विटी या दोन्ही पर्यायांतील बाजारचक्रांचाही एकत्रित लाभही पॉलिसीधारकांना यामुळे मिळविता येईल.

गुंतलेल्या पशाची चक्रवाढवृद्धी हा गुंतवणुकीत सातत्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. या चक्रवाढवृद्धीपायी दीर्घ कालावधीत गुंतवणूक करीत आलेल्या छोटय़ा रकमेतून अंतिमत: कल्पनाही करता येणार नाही अशा आश्चर्यकारक पुंजीतून तुमची विविध स्वप्ने पूर्ण करता येतील. परंतु मुदत पूर्ण होण्याआधीच युलिप योजनेतून बाहेर पडलात तर मात्र चक्रवाढीच्या फायद्यांना मुकावे लागेल. याचा वाईट परिणाम असा की, गमावलेला कालावधी भरून काढण्यासाठी तुम्हाला भविष्यासाठी तरतूद म्हणून मोठी आणि एकरकमी गुंतवणूक करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.

मुदतपूर्व निर्गमनाची किंमत

समजा, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला १५ वर्षांनंतर १० लाख रुपये हवे असतील, तर वार्षिक सात टक्के असा सरासरी वाढीचा दर गृहीत धरल्यास तुम्हाला मासिक ३,०९० रुपये १५ वर्षे गुंतवीत राहावे लागतील. मात्र समजा पाचवे वर्ष संपल्यावर तुम्ही या गुंतवणुकीतून बाहेर पडलात. तर हा गुंतलेला पसा न मिळविता, जर तुम्हाला निर्धारित १० लाख रुपये उभे करण्याच्या उद्दिष्टासाठी, वार्षिक सात टक्के असा सरासरी वाढीचा दर गृहीत धरून पुढील १० वर्षे मासिक ५,६५१ रुपयांची गुंतवणूक करणे भाग ठरेल. चक्रवाढीच्या प्रक्रियेची गती कमी झाल्यामुळे अपेक्षित परतावा रकमेमध्ये त्वरित तोटा येऊ शकतो ज्याची नियमित गुंतवणुकीपेक्षा अधिक मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून भरपाई करणे आवश्यक बनते.

दीर्घावधीच्या गुंतवणुकीची वृद्धीक्षमता गमावण्याबरोबरच, निर्धारित आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी हाती शिल्लक राहिलेला वेळही कमी राहतोच, आयुर्वम्यिाचे संरक्षक कवचही गमावले जाण्याचा धोका पाहता, गुंतवणुकीत सातत्य राखणेच शहाणपणाचे ठरेल.

आपल्या परंपरेत इच्छा व गरजा पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाचे विशेष स्थान आहे. आयुर्विमा योजनांना जरी कल्पवृक्ष म्हणता येत नसले, तरी आर्थिक आपत्तींपासून संरक्षण आणि भविष्यासाठी निर्धारित स्वप्नांच्या पूर्ततेच्या दृष्टीने त्यांचे कल्पवृक्षाशी लक्षणीय साम्य जरूरच आहे. अर्थात या ठिकाणी महत्त्वाचे हेच की, वर्षांनुवर्षे आपल्याला या कल्पवृक्षाचे पालनपोषण करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते गरजेच्या वेळी आपल्याला फलदायी ठरेल.

(लेखक, आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्सचे मुख्य विपणन अधिकारी आणि उत्पादन विभागाचे प्रमुख)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 2:42 am

Web Title: life insurance need for dream fulfillment zws 70
Next Stories
1 रिलायन्स म्युच्युअल फंड आता निप्पॉन इंडिया
2 वित्तचिंतेचा ६.२१ लाख कोटींना फटका
3 उद्यमशील, उद्य‘मी’ : आस्थापनेची रचना आणि प्राप्तिकर
Just Now!
X