06 July 2020

News Flash

लोकमान्य रिटेलची ‘हमस्वदेशी डॉट कॉम’ ई-पेठ

संपूर्ण स्वदेशीच नव्हे तर घरगुती बनावटीच्या २५० उत्पादकांच्या जवळपास १० हजारांच्या घरात उत्पादनांची ई-पेठ...

| August 21, 2015 01:46 am

संपूर्ण स्वदेशीच नव्हे तर घरगुती बनावटीच्या २५० उत्पादकांच्या जवळपास १० हजारांच्या घरात उत्पादनांची ई-पेठ ‘हमस्वदेशी डॉट कॉम’ (Humswadeshi.com) या नावाने लोकमान्य रिटेल प्रा. लि.ने सुरू केली आहे.

स्त्री-पुरुष व मुलांचे तयार वस्त्र, स्वयंपाकघरातील वस्तू, घरसजावटीच्या वस्तू, भेट वस्तू, व्यक्तिगत निगा उत्पादने, तसेच बेल्ट्स, बॅग्ज, पर्स या फॅशन अ‍ॅक्सेसरीज् अशा विभागांमध्ये हमस्वदेशी उत्पादने विक्रीला खुली झाली आहेत. केवळ स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीच्या या ई-कॉमर्स उपक्रमांतून पहिल्या वर्षी ५० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे, असे हमस्वदेशीचे व्यवस्थापकीय संचालक किरण दीक्षित यांनी सांगितले. या नवोद्योगी कंपनीची व्यवसाय विस्तारासाठी अनेक गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू असून, स्वदेशी संकल्पना स्वीकारल्याने गुंतवणूकदारही भारतीयच असतील, यावर कटाक्ष असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2015 1:46 am

Web Title: lokmanya retail humswadeshi website
Next Stories
1 परिघ रुंदावला.. : बँकिंग क्षेत्रात रिलायन्स, बिर्ला, महिंद्र समूह
2 टाटा समूहाची ‘उबर’मध्ये गुंतवणूक
3 सरकारी बँकांचे भांडवलीकरण स्वागतार्ह, पण समस्येवरील संपूर्ण उतारा नव्हे!
Just Now!
X