गुंतवणूकदारांसाठीच्या ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे तज्ज्ञांच्या हस्ते प्रकाशन

कर टप्प्यातील बदल सुचविणारा अर्थसंकल्प सादर झाला. घर खरेदीतून होणाऱ्या भांडवली लाभाची व्याख्याही स्पष्ट झाली. नवे वित्त वर्ष सुरू होताना आता प्रत्यक्षात आर्थिक नियोजन कसे करावयाचे? अर्थसंकल्पात नेमके काय बदल केले? त्यादिशेने आता गुंतवणूक ध्येय कसे असावे? २०१६ च्या तुलनेत चालू वर्षांत अधिक परतावा कसा गाठता येईल? अशा अनेक प्रश्नांनी उत्तरे मिळण्याची घटिका अखेर समीप येऊन ठेपली आहे.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक आणि अर्थनियोजनाचे दिशादर्शन’ हा   अर्थसाक्षरतेचा जागर मंगळवार, २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम) येथे होत आहे. या उपक्रमाचे सहप्रायोजक गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज हे आहेत. तर पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, पुराणिक बिल्डर्स असून, बँकिंग पार्टनर जनकल्याण सहकारी बँक आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदी आणि नजीकच्या भविष्यातील आर्थिक नियोजन या दिशेने गुंतवणूकदारांबरोबर उहापोह करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांची फळीही सज्ज झाली आहे. गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसन करण्याबरोबरच ‘लोकसत्ता – अर्थसल्ला’तील मार्गदर्शक तत्त्वे यावेळी उलगडली जाणार आहेत. बचतीशी संबंधित भांडवली बाजार, म्युच्युअल फंड, कर, आर्थिक नियोजन अशा विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी सोदाहरणासह गुंतवणुकीवर चर्चा करणार आहेत.

lok-chart

‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’च्या चौथ्या वार्षिकांकाच्या निमित्ताने मध्य मुंबईकरांसाठी आयोजित या गुंतवणूक जागराकरिता सर्वासाठी प्रवेश खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रितांकरिताही काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चा आर्थिक साक्षरतेचा नवा टप्पा यानिमित्ताने सुरू होत आहे.