18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

हवामान बदलाचा दूध उत्पादनाला फटका

भारतात २०२२ पर्यंत २० कोटी टनांपर्यंत कमी दूध उत्पादनाची उद्योग परिषदेत भीती

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 21, 2017 5:25 PM

भारतात २०२२ पर्यंत २० कोटी टनांपर्यंत कमी दूध उत्पादनाची उद्योग परिषदेत भीती

हवामान बदलामुळे २०२० पर्यंत दरवर्षी दुधाचे उत्पादन ३० लाख टनने कमी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारताला २०२२ पर्यंत २० कोटी टनपर्यंतच्या कमी दुध उत्पादनाला तोंड द्यावे लागेल, असेही नमूद करण्यात आले आहे. भारतीय डेअरी असोसिएशनच्या (पश्चिम विभाग) वतीने हवामान बदल आणि दुग्धव्यवसाय या विषयावर आयोजित परिषद गोरेगाव, मुंबईत गुरुवारपासून सुरू  झाली. तीन दिवसांच्या या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय दूध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप राठ यांनी केले. इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, संघटनेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष सुभाष चंद्र मांडगे, सर चिटणीस राजेश लेले, राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानचे संचालक डॉ. ए. के. श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

ल्युब्रिझॉल – फिनोलेक्स दरम्यान भागीदारी करार

मुंबई : ल्युब्रिझॉल कॉर्पोरेशन या सीपीव्हीसी कंपाऊंडचे संशोधक कंपनीने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या पीव्हीसी पाइप आणि फिटिंग उत्पादक कंपनीबरोबर फ्लोगार्ड प्रक्रियेसाठीच्या करारावर नुकतीच स्वाक्षरी केली. या करारानुसार भारतात फिनोलेक्स फ्लोगार्ड प्लस पाइप्स आणि फिटिंगचे उत्पादन आणि विक्री करेल. हे उत्पादन मार्च २०१७ च्या शेवटच्या आठवडय़ात फिनोलेक्स इंडस्ट्रीजतर्फे बाजारात सादर केले जाईल.

 

‘जीजेएससीआय’चया विजेत्यांची हुपारी कारागीरांशी भेट

मुंबई : पारंपरिक पद्धतीने दागिने घडविणाऱ्या कलाकारांची उन्नती करण्याच्या उद्दिष्टाने ‘जेम्स अँड ज्वेलरी स्कील कौन्सिल ऑफ इंडिया’तर्फे ‘रिव्हाइव्ह डिझाइन’ स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील स्पर्धकांना हुपारी (कोल्हापूर) या रुपेरी शहराची भेट घडविली. चांदीचे दागिने घडविण्याची २०० वर्षांची परंपरा जपणाऱ्यांची तरुण गुणवंतांशी सांगड घालावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुपारीतील कारागीर हे गुजरव/घुंगरू या एकसंध चांदीच्या गोळ्यांचे एकमेव पुरवठादार आहेत.

First Published on February 17, 2017 1:18 am

Web Title: loksatta financial news