गुंतवणूकदारांकडून अनेकदा अधिक परताव्यापोटी जोखीम कालावधीचा विस्तार होतो. याबाबत सजग करत आहेत एल अ‍ॅन्ड टी म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कुलकर्णी

* तुम्ही २० वष्रे वैयक्तिक आíथक सेवा या क्षेत्राशी समंधीत आहात. तुमचा या क्षेत्रातील अनुभव काय आहे?
प्रत्येक व्यक्तीला जी गुंतवणूक करते त्या व्यक्तीला आपल्या गुंतवणुकीवर थोडा अधिक परतावा हवा असतो. थोडा अधिक हा शब्द त्या गुंतवणूकदाराच्या अपेक्षांवर अवलंबून असतो. बँकांच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करणारया ठेवीदाराला पाव टक्का तर रोखे गुंतवणूक असणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अर्धा टक्का तर समभाग गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक असणारया गुंतवणूकदारांना ४ ते ५ टक्के अधिक परताव्याची अपेक्षा असते. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. परंतु ही थोडा अधिक परतावा मिळविण्यासाठी आपण नक्की किती जोखीम पत्करत आहोत याची कल्पना नसते. परताव्याचा दर हा नेहमीच जोखीम संलग्न असतो. त्यामुळे आशिक परताव्याच्या मोहात न पडता आपण स्वीकारत बसलेल्या जोखमीचे मूल्य मापन होणे गरजेचे वाटते.
* म्हणजे गुंतवणूकदारांचे नेमके वर्तन कसे असते?
बँकांच्या मुदत ठेवीत गुंतवणूकरणारी व्यक्ती म्युच्युअल फंडांच्या योजनांतून गुंतवणूक करते. ही गुंतवणूक करतांना आपली अल्प कालीन वित्तीय उद्दिष्टे कोणती, नक्की रोकड सुलभता किती ठेवायची याचा विचार करीत नाहीत. जेव्हा गुंतवणूक केलेल्या रोकडीची आवश्यकता भासते तेव्हा गुंतवणुकीचे मूल्य नकारात्मक असते. तेव्हा ही व्यक्ती पुन्हा बँकांच्या मुदत ठेवींकडे वळते. हे टाळण्यासाठी गुंतवणूक सामोपादेशानाची आवश्यकता असते.
* अनेक जणाची पसंती बाजार सलग्न परताव्याच्यापेक्षा निश्चित दराने परतावा देणाऱ्या गुंतवणूकसाधनांना असते. याबाबत आपली काय निरीक्षणे आहेत?
दीर्घकालीन बाजार संलग्न परतावा देणारया योजनांचा परतावा निश्चित उत्पन्न देणारया योजनांच्या परताव्यापेक्षा अधिक असतो. परंतु त्यासाठी दीर्घकालीन एसआयपी सारख्या गुंतवणुकीची आवश्यकता असते.तुम्ही म्हणाल की मी ३ ते ५ वष्रे गुंतवणूक करेन व मला अव्वल परतावा मिळायला हवा तर तसे होणार नाही. बाजारात देशात व देशाबाहेरील घडणाऱ्या घटनांना प्रतिसाद देत असतो. साहजिक घडणाऱ्या घटना जगावर किंवा एखाद्या भौगोलिक प्रांताच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करणारे असतात. त्यानुसार बाजाराचा कल हा वर खाली होत असतो. कल सकारात्मक असेल तर नफा व नकारात्मक असेल तर तोटा होतो. परंतु दीर्घकालीन विचार केल्यास समभाग गुंतवणुकीतून नफाच हे विधान खालील आकडेवारीवरून दिसून येथे. ८ जानेवारी २००८ रोजी सन्सेक्सने २०,८७३ हा सर्वकालीन उच्चांक प्रस्थापित केला. नंतर १७ ऑक्टोबर २००८ रोजी ९,९७५ पर्यंत खाली येऊन पुन्हा १७ ऑक्टोबर २०१९ रोजी १७,३२६ तर १७ ऑक्टोबर २०१३ रोजी २०,४१६ झाला. म्हणजे काही वर्षांच्या खंडानंतर निर्देशांकाने नवीन उच्चांक प्रस्थापित केलेले दिसून येते. म्हणजेच समभाग गुंतवणूक दीर्घकालात अव्वल परतावा देते. हीच गोष्ट रोखे गुंतवणुकीतीबाबत म्हणता येईल. २०१३ च्या रुपयाच्या घसरणीशी सामना करतांना रिझव्‍‌र्ह बँकेने व्याज दर वाढविले; परंतु व्याजदर स्थिरावाताच रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांनी साकारात्माल परतावा दिला. म्हणू स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजना स्थिर उत्पन्नाची हमी देत नाहीत तसेच बाजार सलंग गुंतवणुका सतत नकारात्मक परतावा देत नाहीत. हे मुदत ठेवी सारख्या बाजार सलग्न परतावा नसलेल्या गुंतवणूकदारांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे.
* तुमच्या मते, मग अनभिज्ञ गुंतवणूकदारांनी काय करणे आवश्यक आहे?
अनभिज्ञ गुंतवणूकदारांनी किंवा पहिल्यांदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपली जोखीम क्षमता निश्चित करणे गरजेचे आहे. स्वत:च्या मनाने किंवा एखादा मित्र किंवा नातेवाईकाने गुंतवणूक केली म्हणून त्याच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे टाळावे. याचे कारण त्याची जोखीम क्षमता व तुमची जोखीम क्षमता भिन्न असण्याचा संभाव आहे तसेच तुमची वित्तीय ध्येये व तुमच्या मित्राची वित्तीय ध्येये भिन्न असल्याने वित्तीय घ्येये गुंतवणुकीचा कालावधी इत्यादीशी सुसंगत फंड सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीसाठी निश्चित करणे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की समभाग गुंतवणूक ही दीर्घकालीन व सातत्याने करण्याची गोष्ट असून परताव्याचा मोठा दर हवा असेल तर नमित्तिक चढ उतारांकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन गुंतवणूक करणे आवश्यक आहे.