एक लाख अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँक घोटाळ्याची ५,०७६ प्रकरणे दाखल झाल्याची माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली. २०१६-१७ मध्ये नोंदले गेलेल्या या घोटाळ्यामुळे बँकांचे १६.७८ लाख रुपये नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले.

राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितले की, बँकांमधील एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ५,०७६ घोटाळे प्रकरणामुळे ७६ बँकांचे १६,७८,८५३ रुपयांचे नुकसान झाल्याचे गंगवार म्हणाले. पैकी स्टेट बँकेने ५४४ प्रकरणात १,९१,२९५ रुपयांचे नुकसान सोसले असल्याचेही त्यांनी सांगितले. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेला आर्थिक घोटाळ्याच्या ६८८ प्रकरणांमध्ये ३६,८४४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले.

एका अन्य प्रश्नांच्या उत्तरात गंगवार यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे २०१६-१७ मध्ये ८१,३०९ तक्रारी आल्या. त्यापैकी ७७,२९१ तक्रारींचा निपटारा झाला आहे. सर्वाधिक, ३०,५८१ तक्रारी स्टेट बँकेबाबत आहेत.