News Flash

स्वस्त कर्जदराने सारेच खुश!

वाढत्या बुडित कर्जाचा सामना करणाऱ्या बँकांना यातून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

व्याजदर कपातीचा धडाका कायम

निश्चलनीकरणाच्या समाप्तीला पंतप्रधानांनी दिलेल्या कमी कर्ज व्याजदराच्या प्रतिसादाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. स्वस्त कर्ज व्याजदराचा धडाका बँकांमार्फत सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिला.

सोमवारी खासगी बँकांनीही कमी कर्ज व्याजदराला साथ दिली. या क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, बंधन बँक यांनी सोमवारी वार्षिक कर्ज व्याजदर कमी केल्याची घोषणा केली. आयसीआयसीआय बँकेचा नवा कर्ज व्याजदर ०.७ टक्के कमी, ८.२० टक्के असेल. तर खासगी क्षेत्रातील बंधन या नव्या बँकेने कर्ज व्याजदर थेट १.४० टक्क्य़ाने खाली आणले.

निश्चलनीकरणामुळे बँकांकडे मोठय़ा स्वरूपात रोकड जमा झाली असून कर्जावरील व्याजदर कमी केल्याने बँकांना आता विनासाय वित्त पुरवठा करता येणे शक्य होणार आहे. वाढत्या बुडित कर्जाचा सामना करणाऱ्या बँकांना यातून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

ेकमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केल्याने देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेला वित्त पुरवठय़ातील ८ ते ९ टक्के वाढ अपेक्षित आहे. बँकेने रविवारी कर्ज व्याजदर ८ टक्के असे उद्योगातील सर्वात कमी स्तरावर आणून ठेवले. निश्चलनीकरणानंतर बँकेची पतपुरवठा वाढ अवघी ६.७ ते ६.८ टक्के होती. तत्पूर्वी बँकेने १२ टक्के वाढीचा अंदाज केला होता.

गृह कर्ज व्याजदर कपातीबरोबरच पंतप्रधानांच्या प्रोत्साहनामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थावर मालमत्ता क्षेत्राला नवसंजीवनी प्राप्त होईल, अशी आशा उद्योगातून व्यक्त होत आहे. उद्योग, कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधानांनी सूचित केल्याप्रमाणे बँकांनी करावयाच्या उपाययोजना आकार येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

अल्प व मध्यम उत्पन्न गटात कर्ज पुरवठा करणाऱ्या बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना देशाच्या निमशहरी भागात आता अधिक संधी असल्याचे मत डीएचएफएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल मेहता यांनी व्यक्त केले.

२०२२ पर्यंत सर्वाना घरे हे सरकारचे उद्दीष्ट आता दृष्टीक्षेपात येईल, असा विश्वास खुश हाऊसिंग फायनान्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अमित किरिट मागिया यांनी व्यक्त केला.

उद्योगांना उभारी

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बँकांनी लावलेला व्याजदर कपातीचा धडाका पाहून उद्योग क्षेत्राचेही मनोबल उंचावले आहे. आघाडीच्या बँका त्यांचे कर्ज व्याजदर कमी करत असल्याने अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’ने व्यक्त केला आहे. मध्यम कालावधीसाठी देशाचे उद्योग क्षेत्र व एकूणच अर्थव्यवस्था वाढीच्या दिशेने मार्गक्रमण करेल, असे मत संघटनेचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. नव उद्यमी तसेच लघू व मध्यम उद्योगांना यामुळे संजीवनी मिळेल, असेही ते म्हणाले.

अल्पबचत योजनांवरील वार्षिक व्याजदर स्थिर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकासपत्र आदींसारख्या योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अल्प बचतीवरील व्याजदर बदलाची प्रक्रिया दर तिमाहीला केली जाते. मात्र २०१७ च्या पहिल्या, जानेवारी ते मार्च या तिमाहीकरिता अशा योजनांचे व्याजदर स्थिर असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अल्प बचत योजनांवरील तिमाही व्याजदर बदलाचे धोरण सरकारने एप्रिल २०१६ पासून अंगीकारले आहे. असे असले तरी नव्या तिमाहीसाठीचे दर मात्र डिसेंबरअखेरच्या तिमाहीप्रमाणेच असतील, असे सोमवारी जाहीर करण्यात आले.

यानुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) वरील व्याजदर वार्षिक ८ टक्के असेल. तर पाच वर्षे मुदतीच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर वार्षिक ८ टक्के दरानेच व्याज मिळेल. किसान विकास पत्रावरील ७.७ टक्के व्याजदर कायम असेल. सुकन्या समृद्धी खाते योजनांवर ८.५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवर ८.५ टक्के असा दर असेल.

बँकांच्या बचत ठेवींवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. मात्र बचत ठेवींवरील दरदेखील वार्षिक ४ टक्के असे स्थिर ठेवण्यात आले आहेत. तर दीड वर्षे मुदतीच्या ठेवींसाठी ७ ते ७.८ टक्के असतील. ५ वर्षे मुदतीच्या आवर्ती ठेव (रिकिरग) ७.३ टक्के दर लागू असेल. हे दर तिमाहीकरिता आहेत. ३१ मार्च २०१७ पर्यंत हे दर असतील.

एप्रिल २०१६ मध्ये आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील दर ८.७ टक्क्य़ांवरून ८.१ टक्के असे कमी केले गेले होते. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ते काही प्रमाणात कमी करत वार्षिक ८ टक्क्य़ांवर आणून ठेवले होते. एप्रिल २०१६ मध्ये चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील दर ८.७ टक्क्य़ांवरून ८.१ टक्के असे कमी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:35 am

Web Title: low rate of loan
Next Stories
1 विक्रीतील वृद्धीदर घसरण्याची भीती
2 नकारात्मक नववर्षांरंभ!
3 आठवडय़ाची मुलाखत : गुंतवणुकीबाबतचा भविष्याचा अंदाज तिमाही निकालांवरून बांधणे धोक्याचे
Just Now!
X