News Flash

वाहनांवरील ‘जीएसटी’ कपात अर्थव्यवस्थेसही लाभदायी ठरेल – आनंद महिंद्र

प्रवासी वाहनांच्या विक्रीत निरंतर घसरण सुरू असून, ती सरलेल्या महिन्यांत २० टक्क्यांनी घटली आहे.

| July 3, 2019 04:28 pm

प्रतिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : वाहन उद्योगाशी निगडित पूरक कंपन्या आणि त्यातील रोजगाराचे प्रमाण पाहता, या उद्योगावरील वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची मात्रा कमी करणे हे एकंदर अर्थव्यवस्थेला लाभकारक ठरेल, असे प्रतिपादन महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी बुधवारी  केले.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत निरंतर घसरण सुरू असून, ती सरलेल्या महिन्यांत २० टक्क्यांनी घटली आहे. गेल्या १८ वर्षांतील मासिक विक्रीचा हा सर्वात निम्नस्तरावर आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वच वाहन निर्मात्यांनी विक्रीत घसरणीला रोखण्यासाठी जीएसटी कपातीच्या केलेल्या मागणीला महिंद्र यांनी बुधवारी ‘ट्वीट’ करून दुजोरा दिला.

वाहन विक्रेत्यांच्या महासंघ ‘फाडा’चे माजी अध्यक्ष जॉन के. पॉल यांनी, वाहनांवरील जीएसटी कपातीतून भारताच्या वाहन उद्योगाचे वृद्धीचक्र पुन्हा गती पकडेल आणि देशातील सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे हे तिसरे मोठे उद्योग क्षेत्र असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याला प्रतिसादादाखल महिंद्र यांनी वरील प्रतिपादन ट्विप्पणीद्वारे केले आहे. वाहन निर्मात्याची संघटना ‘सियाम’ने, आगामी अर्थसंकल्पातून सर्व प्रकारच्या वाहनांवरील जीएसटीचा दर हा सध्याच्या २८ टक्क्यांवरून सरसकट १८ टक्क्यांवर आणला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मागील ११ पैकी १० महिने (ऑक्टोबर २०१८ वगळता) प्रवासी वाहनांच्या विक्रीचा घसरता आलेख राहिला आहे. मे महिन्यातील घसरण तर सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या २१.९१ टक्के घटीनंतरची सर्वात मोठी घसरण ठरली आहे.

विद्युत वाहनांसंबंधी सरकारच्या उद्दिष्टाला टाटांचाही विरोध

नवी दिल्ली : देशातील कंपन्यांनी सर्व दुचाकी तसेच तीनचाकी वाहने विहित कालावधीत विजेवर धावणारीच असतील, अशा सरकारच्या आग्रही उद्दिष्टाला टाटा समूहानेही विरोध केला आहे. सरकारने आपले लक्ष्य रेटण्यापूर्वी  आवश्यक सुविधांची रचना व यंत्रणा राबवावी, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

इंजिन सक्षमतेबाबत १५० सीसीपर्यंतची सर्व दुचाकी वाहने २०२५ पर्यंत विजेवर चालणारी असावीत, असा आराखडा निती आयोगाने तयार केला आहे. मात्र त्याला गेल्या काही दिवसांमध्ये हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर, बजाज ऑटोसारख्या कंपन्यांनी विरोध नोंदविला आहे. टाटा समूहानेही याबाबत नकारार्थी मत व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 3:56 am

Web Title: lower gst on automobiles will help economy anand mahindra zws 70
Next Stories
1 लघुउद्योगांना १५,००० कोटींचे पाठबळ!
2 महिला उद्यमशीलता योजना अनेक, लाभार्थी थोडक्याच!
3 डीएचएलएफचे म्युच्युअल फंड व्यवसायातून निर्गमन
Just Now!
X