20 January 2018

News Flash

घसरणीची ‘साप्ताहिकी’

भांडवली बाजाराने घसरणीची साप्ताहिकी यंदा राखली. सलग सात सत्रात घसरणारा ‘सेन्सेक्स’ यामुळे १९,५०० च्याही खाली आला आहे. तर ‘निफ्टी’ ५,९०० वर राहिला आहे. बाजार २०१३

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 9, 2013 5:08 AM

शेअर बाजाराने गाठला २०१३ मधील तळ ‘सेन्सेक्स’ १९,५०० च्या खाली; ‘निफ्टी’ ५,९०० वर

भांडवली बाजाराने घसरणीची साप्ताहिकी यंदा राखली. सलग सात सत्रात घसरणारा ‘सेन्सेक्स’ यामुळे १९,५०० च्याही खाली आला आहे. तर ‘निफ्टी’ ५,९०० वर राहिला आहे. बाजार २०१३ मधील सर्वात खालच्या स्तरावर आहे.
सगल पाच सहा सत्रातील घसरणीचा यापूर्वीचा नोव्हेंबर २०१२ मधील क्रम ‘सेन्सेक्स’ने कालच पार केला होता. घसरत्या विकास दराच्या अंदाजाची चिंता सलग दुसऱ्या दिवशी वाहताना मुंबई निर्देशांकाने शतकी घसरणीची नोंद केली.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने २०१२-१३ साठीचा अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर दशकातील सर्वात कमी, ५ टक्क्यांवर राहण्याची भीती व्यक्त केल्याने गेल्या सहा व्यवहारात ४२५ अंशांने घसरलेला ‘सेन्सेक्स’ सप्ताहाची अखेर करताना ९५.५५ अंशांच्या नुकसानासह १९,४८४.७७ पर्यंत खाली आला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३५.३० अंश घसरणीनंतरही ५,९०० च्या वर मात्र ५,९०३.५० पर्यंत राहिला आहे.
‘सेन्सेक्स’ सलग सात दिवस घसरता राहिला. तर ‘निफ्टी’ने बुधवारचा दिवस वगळता (किरकोळ, २.३० अंश वाढ) सप्ताहात सर्व दिवस नकारात्मकता नोंदविली आहे. शुक्रवारच्या प्रमाणातच दोन्ही प्रमुख भांडवली बाजारांनी मंगळवारची घसरण नोंदविली होती. सलग सातव्या सत्रातील मिळून ५२० अंशांची घसरण नोंदविणारा ‘सेन्सेक्स’ १९५०० च्याही खाली येताना २०१३ वर्षांतील सर्वात किमान स्तरावर आला आहे.
बांधकाम, पोलाद, सिमेंट, बँक कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण नोंदली गेली. गृहनिर्माण क्षेत्राबाबतच्या चिंताजनक वातावरणामुळे एकूणच सिमेंट कंपन्यांच्या समभागांवर विपरित परिणाम झाला. या कंपन्यांचे समभाग मूल्य तब्बल ३ टक्क्यांपर्यंत आपटले.
रिलायन्स, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी यासारखे ‘सेन्सेक्स’मधील २१ समभाग घसरणीच्या यादीत नोंदले गेले. युरोपीय आणि आशियाई बाजारांमध्ये मात्र तेजी होती.
                                    सेन्सेक्स        निफ्टी
शुक्रवार        १९४८४.७७ (-९५.५५)    ५,९०३.५० (-३५.३०)
गुरुवार        १९,५८०.३२ (-५९.४०)    ५,९३८.८० (-२०.४०)
बुधवार        १९,६३९.७२ (-२०.१०)    ५,९५९.२० (+२.३०)
मंगळवार    १९,६५९.८२ (-९१.३७)    ५,९५६.९० (-३०.३५)
सोमवार        १९,७५१.१९ (-३०.००)    ५,९८७.२५ (-११.६५)
सर्व क्षेत्रीय, एकूण ‘सेन्सेक्स’मध्ये घसरण नोंदली गेली असली तरी कमकुवत रुपयामुळे माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाने शुक्रवारी किरकोळ, ०.८६% वाढ नोंदविलीच. याचबरोबर भांडवली वस्तू निर्देशांकातील तेजीही दुर्लक्षित करता येणार नाही.    
– अलेक्स मॅथ्युज, प्रमुख संशोधक,
जिओजित बीएनपी पारिबास फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण सप्ताहाखरिसही कायम राहिली आहे. रुपया शुक्रवारी ६ पैशांनी घसरला. आठवडय़ाच्या सुरुवातीला, सोमवारी ५३.२८ वरून ५३.१३ पर्यंत झेप घेणारा रुपया गेल्या सलग तीन सत्रात घसरल्याने आता ५३.२२ वर आला आहे.

First Published on February 9, 2013 5:08 am

Web Title: lowmarket rate from last week continuously
  1. No Comments.