04 August 2020

News Flash

एल अँड टी इन्फोटेकची डिसेंबपर्यंत बाजारात सूचिबद्धता

बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील महाकाय कंपनी लार्सन अँड टुब्रोने आपले माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील अंग असलेल्या एल अँड टी इन्फोटेकचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून,

| June 24, 2015 06:36 am

बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील महाकाय कंपनी लार्सन अँड टुब्रोने आपले माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील अंग असलेल्या एल अँड टी इन्फोटेकचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून, या कंपनीच्या समभागांच्या खुल्या भागविक्रीपश्चात शेअर बाजारात सूचिबद्धतेचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबपर्यंत कंपनीच्या समभागांच्या सूचिबद्धतेचा निश्चित कार्यक्रम योजण्यात आला आहे.
लार्सन अँड टुब्रोचे संपूर्ण अंगीकृत घटक असलेल्या एल अँड टी इन्फोटेकची नऊ सेवा केंद्रे देशभरात फैलावली असून, शेव्हरॉन, फ्रीस्केल, हिताची, सान्यो आणि लाफार्जसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना तिच्याद्वारे सेवा पुरविली जात आहे. सुमारे ५,१५० कोटी रुपयांच्या (८१० दशलक्ष अमेरिकी डॉलर) उलाढालीवर एल अँड टी इन्फोटेकने २०१४-१५ आर्थिक वर्षांत ७६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
मूळ प्रवर्तक या नात्याने लार्सन अँड टुब्रोद्वारे भागविक्री प्रक्रियेतून एल अँड टी इन्फोटेकमधील १० टक्के भागभांडवल सौम्य केले जाईल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.
सर्व अत्यावश्यक सोपस्कार पूर्ण करून येत्या नोव्हेंबरमध्ये, फार तर डिसेंबरमध्ये एल अँड टी इन्फोटेकची खुली भागविक्री योजण्यात येईल, असा नाईक यांनी विश्वास व्यक्त केला. लार्सन अँड टुब्रोच्या विद्यमान भागधारकांच्या दृष्टीने आकर्षक ठरेल, असे मूल्यांकन या आयटी सेवा अंगांच्या समभागांना निश्चितच मिळेल, असे नमूद करीत त्यांनी अन्य तपशील देण्यास नकार दिला.

आणखी उपकंपन्यांचीही सूचिबद्धता
बांधकाम क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात कार्यरत अन्य उपकंपन्यांनाही याच पद्धतीने आगामी काही वर्षांत भांडवली बाजारात स्वतंत्रपणे सूचिबद्ध करण्याची योजना असल्याचेही नाईक यांनी याच मुलाखतीत स्पष्ट केले. विशेषत: तेल आणि वायू क्षेत्रात कार्यरत एल अँड टी हायड्रोकार्बन्स, विजेच्या पारेषण व वितरण व्यवसायातील अंगाचीही सूचिबद्धता विचारार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, निर्माण आणि वित्तीय सेवा असे विविधांगी व्यवसाय स्वारस्य आणि ३० हून अधिक देशांमध्ये विस्तार असलेल्या लार्सन अँड टुब्रोचा एकूण महसूल ९६,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2015 6:36 am

Web Title: lt to list it arm infotech by december plans to raise rs 1800 crore
टॅग Bse,Business News,Nse
Next Stories
1 केनेथ आंद्रादे यांचा ‘आयडीएफसी एएमसी’ आणि म्युच्युअल फंड उद्योगालाही रामराम
2 पाच नवीन कार बाजारात आणण्याची फोक्सवॅगनची योजना
3 हॉटेल विक्रीवरून अमेरिकेची सहाराला नोटीस
Just Now!
X