महाभारत हे व्यास ऋषींनी लिहिलेले हिंदू अध्यात्मातील सर्वात मोठे महाकाव्य आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यातील जीवन, नातेसंबंध, यशावर आधारित मौलिक विवेचनाकरिता ते प्रसिद्ध आहे. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या युद्धाचा सारांश त्यात सामावलेला असून चांगले आणि वाईट; गुण आणि दुर्गुणावर केलेले भाष्य आहे. वाईटातील चांगले, यातील नेमका फरक या महाकाव्यात अधोरेखित करण्यात आला आहे. महाभारतावर आधारित असलेली गुंतवणुकीशी निगडीत पाच मुख्य प्रकरणांवर या लेखाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

अर्जुन, भीम आणि युधिष्ठिराला महाभारताच्या रणसंग्रामापूर्वी दिव्योस्त्र, शक्ती आणि धोरणात्मक ज्ञान मिळवण्यासाठी फार मोठा प्रवास करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात योग्यवेळी चांगुलपणा जोपासला गेला. अर्जुन आजीवन विद्यर्थीदशेतच राहिला. त्याने द्रोणाचार्यांकडून लष्करी शास्त्रांचे धडे घेतले, इंद्राकडून दिव्य शस्त्रे मिळवली. महादेवाकडून पशूपतास्ज्ञ आत्मसात केले. त्याने आयुष्यभर युधिष्ठीर आणि कृष्णाला आपले मार्गदर्शक मानले.

जितके शिकता येईल तितकी प्रगती होऊ न अधिकाधिक प्राप्ती शक्य होते. गुंतवणुकीतील ज्ञान हे आपली गुंतवणूक वाढवण्यासाठी मदतीचे ठरते. दुर्दैव म्हणजे अनेकांना गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल काहीच माहिती नसते. आपली मिळकत कशी सुरक्षित करावी आणि वाढवावी याचे ज्ञान नसते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदार आणि भावी गुंतवणूकदार यांनाही म्युच्युअल फंडविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे वित्त निर्मिती किंवा तत्सम उद्दिष्टय़ साधणे अडचणीचे बनले आहे.

मात्र काही गुंतवणूकदार कायम म्युच्युअल फंडासंबंधी वाचन करतात, शोध घेऊन स्वत:ला अद्ययावत ठेवतात. तसेच वित्तीय सल्लागारांची मदत घेऊ न आर्थिक उद्दिष्टय़े गाठतात आणि संपत्ती वाढवत जातात. महाभारताचा आधार घेऊन इतकेच सांगता येईल की, ‘ज्ञान’ हे दिव्यास्त्रपेक्षा कमी नसते. ते आपल्याला आर्थिक उद्दिष्टय़े गाठायला मदत करू शकते, आपल्या प्रियजनांचे भवितव्य त्यामुळे सुरक्षित होऊ शकते. शिवाय त्यामुळे वित्त निर्मितीला हातभार लागू शकतो.

ध्येय—आधारीत नियोजन आणि वेळोवेळी देखरेख एका प्रशिक्षण सत्रादरम्यान द्रोणाचार्य तरुण राजकुमारांना मोकळ्या मैदानात घेऊन गेले. त्याठिकाणी एका झाडावर लाकडी पक्षी टांगलेला होता. अंतरावरून पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्याचा कार्याभ्यास नेमला होता. पक्ष्याच्या डोळ्याचा निशाणा साधताना काय दिसते अशी विचारणा गुरुंनी आपल्या शिष्यांकडे केली. पक्षी, त्याची पिसे, झाडे, जमीन अशी उत्तरे प्रत्येकाने दिली. अर्जुनाने उत्तर दिले की, त्याला केवळ पक्ष्याचा डोळा दिसत असून इतर काहीही दिसत नाही. एकाच निशाण्यात तो पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेऊन त्याला झाडावरून खाली पाडण्यात यशस्वी होतो.

गुंतवणुकीबाबत याचा अर्थ घ्यायचा झाला तर – आर्थिक उद्दिष्टय़े गाठायची असतील तर एखाद्याने लक्ष्याचा अचूक वेध घ्यावा. आपली उद्दिष्टय़े जाणून घ्यावीत. त्यापासून लक्ष विचलित करू नये. बाजारातील चढ—उतार दुर्लक्षित करावेत. हताश करणाऱ्या घटकांपासून चार हात लांब राहावे. तुमच्या उद्दिष्टांकरिता जो वेळ निश्चित केला आहे त्यादृष्टीने परिपूर्ण म्युच्युअल फंड योजना शोधण्याचा सल्ला आहे. गुंतवणुकदारांनी त्यांच्या पोर्टफोलियोचे निरिक्षण करावे, अद्ययावत माहिती घ्यावी. अल्प-कालीन अस्थिरतेने गोंधळून जाऊ नये.

मोठय़ा प्रमाणावर असलेली विविधता ठरते मारक

महाभारताच्या महत्त्वाच्या युद्धात पांडव केवळ पाच होते. त्यांनी १०० कौरवांना मात दिली. नेत्यासाठी संवाद साधणे सोपे असते. १०० जणांच्या गटापेक्षा पाच जणांचा प्रमुख बनणे उत्तम!

कौरवांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यात अशांतता माजली. त्याचमुळे त्यांचा पराभव झाला. याचप्रमाणे गुंतवणुकीतही अनेक पोर्टफोलिओवर नजर ठेवणे कठीण असते. त्यामुळे आकाराने लहान म्हणजे साधारणपणे २०-२५ समभागांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस करण्यात येते. बहु—विविधता म्हणजे मूल्य—वृद्धी नसते हे या उदाहरणावरून दिसून येते.

अंधानुकरण करू नये

अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्राचा पुत्र. मात्र तो एकटाच चRव्युहात प्रवेश करतो (युद्धभूमीवर तयार करण्यात आलेला मनुष्य—निर्मित भूलभुलैय्या) त्याला चRव्यूह भेदण्याचे तंत्र मात्र अर्धवट अवगत असते. या मागील पाश्र्वभूमी अशी की, अभिमन्यू पोटात असताना अर्जुन सुभद्रेला चRव्यूह भेदण्याचे तंत्र सांगतो. मात्र त्याचे बोलणे अध्र्यावर आले असताना सुभद्रेला झोप लागते. त्यामुळे अभिमन्यूला चRव्यूह भेदण्याचे तंत्र अर्धवट अवगत होते. त्यामुळेच तो चRव्युहात तग धरू शकत नाही आणि त्याचा मृत्यू ओढवतो.

गुंतवणूक परिघातही गुंतवणूकदारांनी बाजार अस्थिर असताना गांगरून अविचाराने पाऊल उचलू नये. एखाद्या गोष्टीचे अर्धवट ज्ञान चुकीच्या गुंतवणूक निर्णयाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे कठीण होऊ  शकते. एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी योजनेची माहिती नीट वाचावी किंवा आर्थिक सल्लागाराला संपर्क करावा. याशिवाय वित्तीय सल्लागार हा बाजारात अस्थिरता असताना गुंतवणूकदाराला योग्य सल्ला देऊ शकतो, त्याचे आत्मविश्वसाने मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेला बळी पडत नाही.

सुलभता ठेवा; गुंतागुंत करू नका

महाभारतातील शकुनी हा फासे खेळण्यात पटाईत होता. त्याने पांडवाना हस्तिनापुरला बोलावून घेण्याचे कारस्थान रचले आणि त्यांच्याविरुद्ध खेळ जिंकण्यास दुर्योधनाला मदत केली. त्यात युधिष्ठिराचे राज्यच गेले नाही तर तो आपली सर्व मालमत्ता, भाऊ आणि पत्नी गमावून बसला. धृतराष्ट्राने त्यांची संपत्ती सुरक्षित ठेवली; मात्र पांडव पुन्हा दुसरी फेरी हरले आणि त्यांना १३ वर्षांचा वनवास भोगावा लागला.

गुंतवणूक जगतातही हेच तत्त्व लागू होते. एक गुंतवणूकदार म्हणून जर तुम्ही जोखीम व परतावा किंवा पर्यायी गुंतवणूक पर्याय ओळखण्यात अयशस्वी ठरलात; तर सोपा मार्ग पत्करा. कधीही झटपट परतावा किंवा आकर्षक उत्पादनांच्या भूलथापांना बळी पडू नका. कायम चांगल्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. पैसे कमी मिळवले तरी चालेल; मात्र सर्वकाही गमावण्यात अर्थ नाही!

 

आशिष सोमय्या

(लेखक मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)