16 January 2021

News Flash

महिंद्र फायनान्सचे १००० कोटींचे रोखे आजपासून विक्रीस खुले

बिगरबँकिंग वित्तीय सेवा कंपनी महिंद्र अॅण्ड महिंद्र फायनान्शियल सव्र्हिसेस

बिगरबँकिंग वित्तीय सेवा कंपनी महिंद्र अॅण्ड महिंद्र फायनान्शियल सव्र्हिसेस लिमिटेडने अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) विक्रीला काढून १००० कोटी रुपयांचे ऋणरूपी भांडवल उभारण्याचे ठरविले आहे. या कंपनीची ही पहिलीच रोखे विक्री असून ती बुधवार २५ मे रोजी सुरू होऊन १० जूनपर्यंत सुरू राहील.
प्रत्येकी १००० रु. दर्शनी मूल्य असलेले हे निश्चित व्याज परतावा देणारे रोखे, विविध व्याज आणि मुदत मालिकांमध्ये गुंतवणुकीसाठी नऊ वेगवेगळ्या पर्यायांत उपलब्ध झाले आहेत. किमान ६६ महिने ते कमाल १२० महिने अशी कालमर्यादा, प्रति वर्ष ८.६० टक्के ते ९ टक्के या दरम्यान व्याज या वेगवेगळ्या प्रकारांत देय असेल. या रोखे विक्रीला इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने ‘इंड ट्रिपल ए’ तर केअर लि.कडून ‘केअर ट्रिपल एएए’ असे उच्च मानांकन बहाल करण्यात आले आहे. रोखे विक्रीत भरणा पूर्ण झाल्याच्या १२ दिवसांच्या आत या रोख्यांना मुंबई शेअर बाजारात (बीएसई) नियमित व्यवहारांसाठी सूचिबद्ध केले जाणार आहे.
देशाच्या निमशहरी व ग्रामीण भागात वाणिज्य वाहने, ट्रॅक्टर्स तसेच बांधकाम उपकरणांसाठी कर्जसाहाय्य करणारी ही कंपनी रोखे विक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीचा आपल्या कर्ज वितरणासाठी विनियोग करेल, तसेच दीर्घ मुदतीच्या आणि खेळत्या भांडवलाची गरज भागविणार आहे, अशी माहिती महिंद्र फायनान्सचे कार्यकारी संचालक व्ही रवी यांनी दिली. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ए. के. कॅपिटल सव्र्हिसेस, एडेल्वाइज फायनान्शियल सव्र्हिसेस, जे एम फायनान्शियल, एसबीआय कॅपिटल मार्केट्स आदी या रोखे विक्रीचे व्यवस्थापनपाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 8:18 am

Web Title: mahindra finance to raise rs 1000 cr from ncds
Next Stories
1 भरलेल्या विमा हप्त्याच्या दुप्पट करमुक्त लाभाची संधी
2 रुपयात तब्बल २६ पैसे घसरण
3 विभाजित झालेला स्टरलाइट टेकचा विभाग दूरसंचार क्षेत्रात प्रवेशासाठी सज्ज
Just Now!
X