News Flash

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे मुंबईत आयोजन

१३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत.

| December 18, 2015 04:00 am

भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा शुभारंभ देशाच्या आर्थिक राजधानीत होत आहे.

फेब्रुवारीतील कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते होईल उद्घाटन
भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा शुभारंभ देशाच्या आर्थिक राजधानीत होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत.
१८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात १,००० हून अधिक कंपन्या, तर विविध ६० देश सहभागी होणार असल्याची माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत यांनी गुरुवारी येथे दिली.
भारतातील थेट विदेशी गुंतवणूक वाढण्याच्या मोहिमेला प्रोत्साहन मिळावे, हा या विशेष सप्ताहाच्या आयोजनामागील हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नावीन्य, आरेखन आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित या सप्ताहादरम्यान विदेशी कंपन्यांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले जाईल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रम सुरू केल्यानंतर गेल्या १७ महिन्यांमध्ये वार्षिक तुलनेत थेट विदेशी गुंतवणूक ३५ टक्क्यांनी वाढल्याचेही कांत यांनी सांगितले. फॉक्सकॉन, झेनिथ, आयकिआ, चीनमधील वांडा समूह आदी विविध क्षेत्रांतील कंपन्या भारतात गुंतवणूक करत असल्याचे ते म्हणाले. या योजनेचे खरे आव्हान व्यवसायासाठी सुलभता प्रदान करणे हेच असल्याचेही अमिताभ कांत यांनी या वेळी नमूद केले.
किराणा उद्योग अर्थात मल्टी ब्रॅण्ड रिटेलमधील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढविण्याच्या प्रलंबित मुद्दय़ावर काहीही भाष्य न करता कांत यांनी सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये उदारीकरणाची प्रक्रिया राबविल्याचे अमिताभ कांत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 4:00 am

Web Title: make in india week organized in mumbai
Next Stories
1 बंदर विकासाचे ५०,००० कोटींचे प्रकल्प प्रगतिपथावर
2 अल्केम, लाल पॅथलॅब्स समभागांचे २३ डिसेंबरला बाजारात पदार्पण
3 संरक्षण सामग्रीच्या देशांतर्गत निर्मितीचा रबर उद्योग मुख्य कणा’
Just Now!
X